ती अप्रिय भविष्यवाणी खरी ठरणार? जगाची झोप उडाली, बाबा वेंगानंतर आता भारतातील या संताचंही थरकाप उडवणार भाकीत समोर
बाबा वेंगानंतर आता एका भारतीय संताचं थरकाप उडवणारं भाकीत समोर आलं आहे, या भाकीतामुळे जगाची झोप उडाली असून, चिंता वाढली आहे.

फ्रेंचचा प्रसिद्ध भविष्यवक्ता मिशेल डी नोस्ट्राडेमस, भारताचे प्रसिद्ध भविष्यवक्ते संत अच्युतानंद दास आणि बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनी ती वाचली देखील आहे. मात्र फार कमी लोकांनी त्यातील एका भाकिताकडे लक्ष दिलं असेल. या तीन भविष्यवेत्त्यांनीच नाही तर विदेशातील अनेक लोकांनी याबाबत भाकीत केलं आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही भविष्यवाणी?
कॉमन भविष्यवाणी
नोस्ट्राडेमस, संत अच्युतानंद दास आणि बाबा वेंगा या तीनही भविष्यवेत्त्यांनी एक सारखीच भविष्यवाणी केली आहे. या तीनही भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार आकाशातून एक महाकाय उल्का पडेल, ज्यामुळे जगभरातील अनेक देश समुद्रात बुडतील. तिसरे महायुद्ध अटळ आहे, यातील बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार जगात एक मोठं युद्ध होईल, या युद्धानंतर चीन एक मोठी महासत्ता म्हणून जगासमोर येईल. मात्र या तीन्ही भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेलं एक भाकीत आश्चर्यकारक आहे, त्यांनी भारतामध्ये एक महान नेता जन्म घेईल तो जग बदलेल असं देखील भाकीत वर्तवलं आहे.
संत अच्युतानंद दास यांनी देखील मोठं भाकीत वर्तवलं आहे, ते श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त होते. अच्युतानंद दास यांनी केलेल्या भाकीतानुसार एक वेळ अशी येईल की जगात सर्व लोक हे श्रीकृष्णाचे भक्त बनतील, रशिया हे एक हिंदू राष्ट्र बनेल. रशियामधील शेकडो लोक भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी येतील. भारताचा राज्यकारभार एका संताच्या हाती येईल, तो अविवाहीत असेल, हा नेता पुढे जगभरात सनातन धर्माची स्थापना करेल असं भाकीत संत अच्युतानंद यांनी वर्तवलं आहे. असंच काहीस भाकीत बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांनी देखील वर्तवल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. मात्र तीनही भविष्यवेत्त्यांनी जगात तिसरं महायुद्ध होईल आणि यामध्ये जगातील अनेक देशांचं प्रचंड नुकसान होईल असं भाकीत वर्तवलेलं आहे. त्यामुळे यांची ही भविष्यवाणी आता जगासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
