VIDEO: 100 कोटी लोकांचं व्हॅक्सिनेशन करून भारताने इतिहास रचला, सबका साथ, सबका विश्वासाचच हे फलित: पंतप्रधान नरेंद्र मोदी

| Updated on: Oct 22, 2021 | 10:21 AM

(India achieved a milestone in battle against COVID 19 Pandemic 100 crore vaccination)

VIDEO: 100 कोटी लोकांचं व्हॅक्सिनेशन करून भारताने इतिहास रचला, सबका साथ, सबका विश्वासाचच हे फलित: पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi
Follow us on

नवी दिल्ली: भारताने अनेक अडचणीवर मात करत 100 कोटी लोकांचं लसीकरण केलं. भारताने एक नवा इतिहास रचला. सामूहिक शक्ती आणि सबका साथ, सबका विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे. त्याचंच हे फलित आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

देशाने 100 कोटी व्हॅक्सिनेशनचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधत व्हॅक्सिनेशची निर्मिती, वितरण, लसीकरणासह नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर भाष्य केलं. त्यांनी भाषणाची सुरुवातच एका वेद वाक्याने केली. त्यानंतर त्यांनी व्हॅक्सिनेशन प्रोग्रामवर डिटेल्स माहिती दिली. आपल्या देशाने आपलं कर्तव्य पार पाडलं आणि त्यात यशही मिळवलं. आपल्या देशाने 100 कोटी डोसचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. 130 कोटी लोकांची शक्ती त्यामागे होती. हे यश देशाचं यश होतं. देशवासियांचं यश आहे. त्यासाठी सर्व देशावासियांचं मी अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले.

अनेक समस्यांवर मात

100 कोटी व्हॅक्सिन डोस हा केवळ आकडा नाही. तर देशाच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब आहे. नव्या अध्यायाची सुरुवात आहे. नव्या भारताची सुरुवात आहे. अवघड लक्ष्य पूर्ण करणाऱ्या भारताचं लक्ष्य आहे. भारताने 100 कोटींच लक्ष पूर्ण केलं आहे. त्याची इतर देशाशी तुलना केली जात आहे. त्याचं कौतुकही केलं जात आहे. आपण याची सुरुवात कशी केली हे महत्वाचं आहे. व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात इतर देशांचा हातखंडा होता. आपणही याच देशांवर अवलंबून होतो. त्यामुळे भारतही त्यांच्यावर अवलंबून होता. महामारी आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. भारत कोरोना व्हॅक्सिन तयार करेल का? भारत आपल्या देशातील लोकांची काळजी कशी घेणार? सर्वांना लस देईल का असे प्रश्न निर्माण झाले होते. पण भारताने सर्वांना लस दिली. मोफत दिली. कोणतीही रक्कम घेतली नाही, असं त्यांनी सांगितलं.

व्हीआयपी कल्चरला वाढू दिलं नाही

या लसीकरणामुळे जग भारताला अधिक सुरक्षित मानेल. संपूर्ण जग भारताची ताकद पाहत आहे. सबका साथ सबका विश्वासचं सर्वात मोठं उदाहरण आहे, असं सांगतानाच आजार सर्वांनाच होतो. त्यामुळे त्यावर व्हीआयपी कल्चरचा प्रभाव होऊ नये. केवळ व्हीआयपी लोकांनाच लस मिळू नये याची काळजी घेण्यात आली. कितीही श्रीमंत असला तरी त्याला सामान्य नागरिकांप्रमाणेच ट्रीटमेंट मिळेल हे पाहिलं. त्यामुळेच सर्वांना लस मिळू शकली असं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

PM Modi Speech LIVE | लसीकरणाने देशात मजबूत सुरक्षा कवच, नव्या भारताचं जगाला दर्शन, देशवासियांचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

100 कोटी लोकांचे लसीकरण झाले. आता भारत कोरोनापासून सुरक्षित आहे का?

काश्मीरमधील बिहारी मजुरांच्या सुरक्षेसाठी त्यांना AK-47 द्या, भाजप आमदाराची मागणी

(India achieved a milestone in battle against COVID 19 Pandemic 100 crore vaccination, says PM Narendra Modi)