शस्त्रसंधी झाली, पण भारत वरचढ कसा ठरला? 10 मुद्द्यांत समजून घ्या पाकिस्तानला कसं नमवलं?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती निवळली आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे.

शस्त्रसंधी झाली, पण भारत वरचढ कसा ठरला? 10 मुद्द्यांत समजून घ्या पाकिस्तानला कसं नमवलं?
india pakistan war
| Edited By: | Updated on: May 10, 2025 | 9:50 PM

Indian Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती निवळली आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे. दरम्यान, भारत-पाक यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तर भारताने पाकिस्तानने अप्रत्यक्षपणे विजय मिळवला आहे. हा विजय नेमका कसा मिळवला? हे दहा मुद्द्यांत समजून घ्या…

1) दोन्ही देशांतील तणावाच्या स्थितीत सर्वांत अगोदर पाकिस्तानने भारताशी संपर्क साधला आणि शस्त्रसंधीची चर्चा चालू केली. या कृतीतून भारतीय लष्कराने पाकिस्तानवर चांगलीच जरब बसली होती, हे स्पष्ट होते.

2) भारताची मजबूत स्थिती : भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हल्ले अयशस्वी करून दाखवले. यातून भारतीय लष्कर किती मजबूत आणि कार्यक्षम आहे हे दिसले.
3) पाकिस्तानलाच घ्यावा लागला पुढाकार : पाकिस्तानच्या डीजीएमओने अगोदर भारताला कॉल केला. यातून पाकिस्तानची हतबलता आणि भारताची तकत दिसून येते.

4) दहशतवादाविषयी कठोर भूमिका : भारताच्या ऑपरेशन सिंदरूने पाकिस्तानातील तसेच पीओकेतील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. यातून पाकिस्ताचे विचार उघडे पडले.

5) वैश्विक समर्थन : अमेरिका, सौदी अरेबिया आणि अन्य देशांनी भारताच्या या कारवाईचे कौतुक केले. यातून भारताची राजनयीक बाजू किती मजबूत आहे हे स्पष्ट होते.

7) सैन्याचं श्रेष्ठत्त्व : भारतीय सेनेने पाकिस्तानच्या हल्ल्यांना कोणतीही मोठी हानी न होऊ देता रोखून धरलं. यातून भारतीय सैन्याची ताकत दिसून येते.

7) नागरिकांची सुरक्षा : भारताने या तणावाच्या काळात नागरिकांचा यशस्वीरित्या बचाव केला. तसेच सैन्याच्या तळांनाही सुरक्षित ठेवण्यात यश मिळवलं. यातून भारताचा प्राधान्यक्रम आणि भारताची क्षमता दिसून येते.

8) पाकिस्तान बॅकफूटवर : पाकिस्तान या सर्व परिस्थितीत एक पाऊल मागे गेला. यातून भारताचे श्रेष्ठत्त्व आणि पाकिस्तानचा पराभवच दिसून येतो.

9) राजनैतिक दबाव : भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या काळात विदेशातील लोकांशी बातचित केली. यातून भातराताचा संयमी बाणा दिसून आला आणि दुसरीकडे पाकिस्तानवर दबावही वाढला.

10) भारताची मजबूत स्थिती : भारताने स्वत:च्या अटींवर ही शस्त्रसंधी केली आहे. त्यामुळे आगामी 12 मे रोजी होणाऱ्या चर्चेत भारताची बाजू मजबूत असणार आहे.