भारताचा अमेरिकेला आणखी एक धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय, आता थेट चीनला…

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका आणि भारताचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत, मात्र दुसरीकडे आता भारत आणि चीनची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे, भारताकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

भारताचा अमेरिकेला आणखी एक धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय, आता थेट चीनला...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2025 | 9:40 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भरतावर टॅरिफ लावल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच इतरही मार्गानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एच 1बी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय नुकताच अमेरिकेनं घेतला आहे, याचा देखील मोठ्या प्रमाणात फटका हा भारतालाच बसणार आहे. दरम्यान ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर देखील भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. मात्र दुसरीकडे भरताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. जरी अमेरिकेनं टॅरिफ लावला तरी आम्ही आमच्या बाजरपेठेत भारतीय वस्तूंचं स्वागत करू असं काही दिवसांपूर्वीच चीनने म्हटलं होतं. तर दुसरीकडे भारताच्या चीनसोबत वाढत असलेल्या जवळकीवरून अमेरिकेनं चिंता व्यक्त केली होती, आता पुन्हा एकदा अमेरिकेला धक्का देणारी बातमी समोर आली आहे, आता भारत आणि चीनमधील जवळीक आणखी वाढली आहे, भारतानं मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनानंतर तब्बल पाच वर्षांनी भारतानं चीनला जाणाऱ्या विमानांवरील बंदी हटवली आहे. 2020 पासून एकही विमान थेट चीनसाठी उड्डान करत नव्हतं. मात्र आता पुन्हा एकदा विमानांचा भारत ते चीन असा प्रवास सुरू होणार आहे. 26 ऑक्टोबरपासून इंडिगोकडून चीनसाठी थेट विमान सेवा सुरू होणार आहे. परराष्ट्र खात्याच्या परवानगीनंतर इंडिगोकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या कोलकातामधून  चीनचं शहर ग्वांगझू पर्यंत ही सेवा असणार आहे. दररोज नॉन स्टॉप विमानाची सेवा असणार आहे. त्यानंतर लवकरच दिल्ली ते ग्वांगझू उड्डाण देखील सुरू करण्यात येणार आहेत.

2020 मध्ये जगभरात कोरोनाची लाट पसरली होती, कोरोनाचा फैलाव हा चीनमधूनच झाल्यानं भारतानं थेट चीनला जाणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. त्यामुळे तब्बल पाच वर्ष भारतामधून थेट चीनसाठी विमानाचं उड्डाण बंद होतं. या काळात दोन्ही देशातील प्रवाशी तिसऱ्या देशातून ये -जा करत होते. भारत ते चीनचा प्रवास सिंगापूर मार्गे किंवा थायलंड आणि मलेशिया मार्गे सुरू होता, त्यानंतर आता भारतानं पुन्हा ही विमान सेवा सुरू केली आहे.