AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबादेतील प्राणी संग्रहालयात 8 सिंहांना कोरोनाची लागण, भारतातील पहिलंच प्रकरण!

द हिंदूच्या बातमीनुसार नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

हैदराबादेतील प्राणी संग्रहालयात 8 सिंहांना कोरोनाची लागण, भारतातील पहिलंच प्रकरण!
हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील सिहांना कोरोनाची लागण
| Updated on: May 04, 2021 | 2:46 PM
Share

हैदराबाद : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना पहिल्यांनाच प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमध्ये 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. द हिंदूच्या बातमीनुसार नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB)ने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी केलेली नाही. (Lions in Nehru Zoological Park in Hyderabad infected with corona)

CCMB या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करतील. त्या माध्यमातून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जाईल. इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्राणीसंग्रहलयातील अधिकाऱ्यांकडून सिंहांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरुन त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे का? याची माहिती मिळणार आहे.

यापूर्वी एएनआयने नेहरू जूलॉजिकल पार्कच्या पीआरओनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर प्राण्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली. आम्ही अहवाल येण्याची वाट पाहत आहोत. डॉक्टर सिंहांच्या प्रकृतीचं परिक्षण करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिलीय. यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता भारतात पहिल्यांदाच प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

’24 एप्रिलला सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली’

द हिंदूच्या बातमीनुसार 24 एप्रिलला प्राणि संग्रहालयातील केअरटेकर्सना सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं आणि खाणं जात नसल्याची लक्षणं दिसून आली. त्यानंतर तातडीने पशुपालन अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर सिंहांचा स्वॅब घेण्यात आला आणि ते सीसीएमबीला पाठवण्यात आले.

दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय असलेलं नेहरू जूलॉजिकल पार्क पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. प्राणी संग्रहालयातील 12 पेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकच उपाय, देशव्यापी लॉकडाऊन करा; राहुल गांधी यांची मागणी

मोठी बातमी: राजीव सातवांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन लेव्हल वाढली, उपचारांना प्रतिसाद

Lions in Nehru Zoological Park in Hyderabad infected with corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.