AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून….काय, काय आहेत वैशिष्ट्ये?

First Hydrogen Train Tria: 'हायड्रोजन फॉर हेरिटेज' प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याची योजना रेल्वेची आहे. त्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हायड्रोजन ट्रेनशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून....काय, काय आहेत वैशिष्ट्ये?
hydrogen train
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 01, 2025 | 10:11 AM
Share

First Hydrogen Train Tria: भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज महत्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी आजपासून सुरु होत आहे. पर्यावरणपूरक असलेली ही ट्रेन चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत (ICF) तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या 89 किलोमीटर मार्गावरील चाचणी ३१ मार्चपासून सुरु होत आहे. यशस्वी चाचणीनंतर ट्रेन नियमित कार्यान्वित करण्याची योजना आहे. भारतीय रेल्वेच्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ या विशेष प्रकल्पांतर्गत हरित वाहतुकीच्या दिशेने ही ट्रेन एक मोठे पाऊल आहे. या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत पाहू या…

हायड्रोजन ट्रेन ही हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन आहे. ही ट्रेन पारंपारिक डिझेल गाड्यांना इको-फ्रेंडली पर्याय आहे. हायड्रोजन वायूचा वापर या ट्रेनमध्ये इंधन म्हणून करण्यात आला आहे. हायड्रोजन गॅस ऑक्सिजनसोबत मिळून वीज निर्माण करते. या प्रक्रियेत हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून वीज निर्माण केली जाते. या वीजने ट्रेनची इलेक्ट्रिक मोटर चालवली जाते. हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम मानल्या जातात.

हायड्रोजन ट्रेनचे वैशिष्ट्ये काय?

  • हायड्रोजन पर्यावरणासाठी अनुकूल आहे. कारण त्यामुळे कार्बन डायऑक्साइड किंवा इतर हानिकारक वायू उत्सर्जित करत नाहीत. त्यांचे एकमेव उत्सर्जन पाणी आहे.
  • ट्रेन 1200 हॉर्स पॉवरच्या इंजिनामुळे ताशी 110 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. ते एका वेळी 2638 प्रवासी वाहून नेऊ शकते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे.
  • 8 कोच असलेली ही हायड्रोजन ट्रेन जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेनपैकी एक आहे. हे लांब पल्ल्याच्या मार्गांवर विशेषतः हेरिटेज आणि डोंगराळ मार्गांवर सहज धावू शकते.
  • हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञान डिझेल इंजिनपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम आहे. ही ट्रेन कमी इंधनात जास्त अंतर कापू शकते. ज्यामुळे खर्च कमी होतो.
  • हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा खूपच कमी आवाज करतात. ज्यामुळे प्रवाशांना शांत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याची योजना रेल्वेची आहे. त्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हायड्रोजन ट्रेनशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...