AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?

Hydrogen Train Trail: रेल्वेने मोठी कात टाकली आहे. दिवसागणिक नवीन रेल्वे लाईन होत आहेत. तर वंदे भारतसह इतर आधुनिक ट्रेनचे जाळे अजून मजबूत होत आहे. त्यात आता हायड्रोजन ट्रेनची भर पडणार आहे. काय आहे मोठी अपडेट?

Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट...देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
Hydrogen Train TrailImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 10, 2026 | 2:29 PM
Share

Hydrogen Train Trail: देशातील रेल्वेच्या प्रवासाचा कायापलाट होणार आहे. गेल्या काही वर्षात रेल्वेने कात टाकली आहे. वंदे भारत आणि काही सुपरफास्ट रेल्वेने प्रवाशांचा वेळ वाचला आहे. बुलेट ट्रेनचं स्वप्नही लवकरच साकारणार आहे. तर आता हायड्रोजन ट्रेनची त्यात भर पडली आहे. हायड्रोजन ट्रेनसह इंधन स्टेशनही जवळपास तयार झाले आहे. हायड्रोजन ट्रेनची ट्रायलही पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात प्रवाशांना हायड्रोजन ट्रेनमधून प्रवास करता येईल.

जिंद आणि सोनीपत दरम्यान ट्रायल

हायड्रोजन ट्रेन ही हरियाणातील जिंद आणि सोनीपत या दोन स्टेशन दरम्यान धावली . 85 किमी प्रति तास या वेगाने ही रेल्वे धावली. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रायलच्या आधारावर तांत्रिक त्रुटींचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानंतर अजून काही तांत्रिक बाबी तपासण्यात येतील. अजून चाचणी करण्यात येईल. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर हायड्रोजन रेल्वे लागलीच धावेल.

10 कोचची रेल्वे

देशात आता हायड्रोजन ट्रेनच्या युगाची सुरुवात होणार आहे. डिझेल आणि इलेक्ट्रिक रेल्वेंना अजून एक पर्याय समोर आला आहे. या ट्रेनमध्ये 10 कोच असतील, त्यातील 8 डब्बे हे प्रवाशांसाठी आरक्षित असतील. या कोचमध्ये जवळपास 100 प्रवासी असतील. वाढते प्रदूषण आणि इंधनाचा तुटवडा, तसेच वीजेचा वापर यावर मात करण्यासाठी अजून पर्याय समोर आला आहे. भारत जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन सुरू करणार आहे. हरियाणातील जिंद आणि सोनीपत या दरम्यान हायड्रोजन ट्रेन धावेल.

जगात जर्मनी या देशात दोन कोचची हायड्रोजन ट्रेन सुरू झाली होती. भारतीय हायड्रोजन ट्रेन ही जगातील सर्वात लांब पल्ला गाठेल. रेल्वे चाचणीत तिने 85 किमी प्रति ताशीचा पल्ला गाठला. तर संपूर्ण क्षमतेसह ती लवकरच ताशी 105 किमीने धावेल. ही रेल्वे रोज 360 किलोमीटरचे अंतर कापेल. एकदा हे मॉडल फायदेशीर ठरले तर हा प्रयोग देशभरात राबविण्यात येईल.

काय आहे या ट्रेनचे वैशिष्ट्ये

हायड्रोजन ट्रेनसाठी जिंद येथे खास हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. येथे इलेक्ट्रोलिसिसच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे ही रेल्वे पूर्णपणे देशात तयार करण्यात आली आहे. ब्रॉड गेज रुळावर धावणारी ही जगातील सर्वात जास्त अंतर कापणारी रेल्वे असेल. या रेल्वेत 2,400 किलोवॅटची क्षमता आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!