AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान, चीनला झटका, अमेरिकेच्या बोईंग F15-EX सोबत महाशक्तिशाली एम्बर क्षेपणास्त्र रॅक भारताला मिळणार

एडवांस्ड क्षेपणास्त्र आणि बॉम्ब इजेक्शन रॅक हे एक मोठा क्षेपणास्त्र रॅक आहे. त्याच्या प्रत्येक रॅकमध्ये चार क्षेपणास्त्रे ठेवता येतात. F15-EX लढाऊ विमानाच्या प्रत्येक पंखाखाली चार एम्बर रॅक आणि पोटाखाली एक रॅक आहे.

पाकिस्तान, चीनला झटका, अमेरिकेच्या बोईंग F15-EX सोबत महाशक्तिशाली एम्बर क्षेपणास्त्र रॅक भारताला मिळणार
USA Fighter Palne
| Updated on: Dec 03, 2024 | 9:08 AM
Share

USA Fighter Plane: भारतीय हवाई दल आपल्या लढाऊ विमानांमध्ये नवीन, नवीन मल्टीरोल फायटर एअरक्रॉफ्टचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन बोइंग F-15EX लढाऊ विमानासाठी भारताला ऑफर मिळाली आहे. बोइंग एफ-15 ईएक्सबरोबर एडवान्स एम्बर मिसाइल रॅक भारताला मिळू शकते. जगात बोइंग एफ-15 ईएक्स शिवाय कोणत्याही लढाऊ विमानात असे घातक क्षेपणास्त्र नाही. भारताने हे विमान घेतल्यास भारतीय हवाई दलाची शक्ती वाढणार आहे.

22 क्षेपणास्त्राला घेऊन जाण्यात समर्थ

बोइंग एफ-15 ईएक्स जगातील सर्वात्तम लढाऊ विमान आहे. त्यावर एम्बर मिसाइल रॅक आहे. ते हवेतून हवेत वार करणाऱ्या 22 क्षेपणास्त्राला घेऊन जाण्यात समर्थ आहे. हे विमान एकाच वेळी अनेक एअरपॉड्सला आपले लक्ष करु शकते. हे विमान युद्धाच्या काळात भारतीय हवाईदलाची शक्ती वाढवणार आहे. एम्बर रॅक क्षेपणास्त्राची लवचिकता केवळ हवेतून हवेत लढण्यापुरती मर्यादित नाही. ते लहान आकाराचे बॉम्ब वाहून नेऊ शकते. तसेच थेट हल्ला करणारी शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता देखील त्याच्यात आहे.

काय आहे एम्बर क्षेपणास्त्र रॅक?

एडवांस्ड क्षेपणास्त्र आणि बॉम्ब इजेक्शन रॅक हे एक मोठा क्षेपणास्त्र रॅक आहे. त्याच्या प्रत्येक रॅकमध्ये चार क्षेपणास्त्रे ठेवता येतात. F15-EX लढाऊ विमानाच्या प्रत्येक पंखाखाली चार एम्बर रॅक आणि पोटाखाली एक रॅक आहे. हे 20 लांब पल्ल्याची AIM-120D क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते. तसेच विंग ट्रेलवर दोन कमी पल्ल्याच्या AIM-9X क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. एम्बर रॅकमुळे लढाऊ विमान एकाच वेळी 22 क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते. ही क्षमता सध्या कोणत्याही फायटर जेटकडे नाही.

भारतीय हवाई दलाने 2018 मध्ये 114 लढाऊ विमानांची गरज असल्याचे म्हटले होते. भारतीय नौदलासुद्धा लढाऊ विमाने हवी होती. भारत सरकारच्या घोषणेनुसार सर्व जेटचे उत्पादन मेक इन इंडिया धोरणानुसार भारतात केले जाणार आहे. परंतु हवाईदलाची गरज पाहून आता बोइंग एफ-15 ईएक्सबरोबर एडवान्स एम्बर मिसाइल रॅक भारत घेणार आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.