AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेक कंटेट वापरता जातोय, ट्विटरच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह, केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत?

भारत सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 500 अकाऊंटस् विरोधात कारवाई केली आहे. India Government action against twitter

फेक कंटेट वापरता जातोय, ट्विटरच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह, केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत?
ट्विटर
| Updated on: Feb 11, 2021 | 11:05 AM
Share

नवी दिल्ली: भारत सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 500 अकाऊंटस् विरोधात कारवाई केली आहे. यातील काही अकाऊंटस् कायमस्वरुपी स्थगित करण्यात आली आहेत. फेक कंटेट वापरला जातोय, तुमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं केंद्रानं ट्विटरला फटकारलं आहे.   ट्विटरनं त्यासंबंधी एक ब्लॉग प्रकाशित केला आहेत. ब्लॉगमधील माहितीनुसार बारत सरकारच्या आदेशानंतर काही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत तर काही स्वत:हून बंद करण्यात आली आहेत. भारत सरकारनं ट्विटरला 257 अकाऊंटची माहिती दिली होती. ती बंद करण्यावरुन वाद सुरु आहे. (India Government action against twitter accounts rule violation)

अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा सन्मान करतो

भारत सरकारच्यावतीनं आम्ही देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि टीका करण्याच्या अधिकाराचा सन्मान करतो, असं सांगितलं आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली सरकारच्या विरोधात नरसंहार असे शब्द आणि हॅशटॅग चालवण्यासा मान्यता दिली जाणार नाही, असं सरकारनं ट्विटरला सांगितलं. तर, भारत सरकारच्या सांगण्यावरुन पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांचे खाते बंद करणार नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेत राहू, अशी भूमिका ट्विटरनं घेतली आहे.

सरकारचा 257 अकाऊंटवरील कारवाईसाठी अल्टिमेटम

केंद्र सरकारनं आक्षेप घेतलेल्या #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगसह ट्विट केलेल्या 257 पैकी 126 हॅशटॅग डिअॅक्टिव्हेट करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने हे अकाऊंट्स ब्लॉक केले होते, परंतु लगेचच त्यांनी हे अकाऊंट्स अनब्लॉक केले. हे अकाऊंट्स अनब्लॉक करताना ट्विटरने म्हटलं होतं की तुमचे ट्विट्स हे ‘फ्री स्पीच’मध्ये मोडतात. आता यापैकी काही अकाऊंड्स पुन्हा ब्लॉक करण्यात आले आहेत. मात्र, केंद्र सरकार 257 अकाऊंटसवर कारवाई करण्यासाठी आक्रमक झाले आहे. केंद्र सरकारनं ट्विटर प्लॅटफॉर्मला तुम्ही खोट्या, असत्य, बेनामी आणि स्वयंचलित बॉट अकाऊंटस वापरण्यास परवानगी देते, असं ठणकावलं आहे.

केंद्र सरकारने अजून 1,178 अकाउंट्सची एक यादी ट्विटरला पाठवली आहे. जे अकाऊंट्स खालिस्‍तान आणि पाकिस्‍तानशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यापैकी 583 अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट करण्यात आले आहेत. नियमांचा भंग केल्याचं कारणं देत ट्विटरनं 500 अकाऊंट सस्पेंड केली आहेत. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की, या अकाऊंट्सवरुन होत असलेल्या ट्विट्स आणि कमेंट्मुळे शेतकरी आंदोलनाशी संबंधित यंत्रणेस धोका निर्माण होऊ शकतो’.

संबंधित बातम्या:

‘257 ट्विटर अकाऊंट्स विरोधात कारवाई करावीच लागेल’, केंद्र सराकरचं ट्विटरला अल्टिमेटम

‘तो’ हॅशटॅग, अकाउंट हटवा, नाही तर कारवाई करू; केंद्राची ट्विटरला फायनल नोटीस

(India Government action against twitter accounts rule violation)

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.