‘257 ट्विटर अकाऊंट्स विरोधात कारवाई करावीच लागेल’, केंद्र सराकरचं ट्विटरला अल्टिमेटम

केंद्र सरकारनं आक्रमक भूमिका घेत सोशल मीडिया कंपनीला सांगितलं आहे की या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करावीच लागेल.

'257 ट्विटर अकाऊंट्स विरोधात कारवाई करावीच लागेल', केंद्र सराकरचं ट्विटरला अल्टिमेटम
ट्वीटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 11:15 PM

नवी दिल्ली : 257 ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारनं आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारनं आक्रमक भूमिका घेत सोशल मीडिया कंपनीला सांगितलं आहे की या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करावीच लागेल. दरम्यान ट्विटरने भारत सरकारनं दिलेल्या आदेशानंतर काही ट्विटर अकाऊंटवर कारवाई करत ते बंद केले आहेत. मात्र, सरकारनं सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाई केली गेलेली नाही. अशा स्थितीत सरकारनं सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाई करावीच लागेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.(257 Twitter accounts to be cracked down on, central government orders Twitter)

मंत्रालयाने ट्विटरला आतापर्यंत योग्य कारवाई न केल्याबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत. सरकारने ट्विटरला जवळपास 1 हजार 178 ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यास सांगितलं होतं. त्यातील जवळपास 500 ट्विटर अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली. बुधवारी ट्विटरने याबाबत माहिती दिली आहे की, त्यांनी सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्ट, राजकीय मंडळी आणि माध्यमांच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई केलेली नाही.

Twitter चा देशी पर्याय Koo!

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी ट्विटरचा स्वदेशी पर्याय Koo मध्ये सहभागी होण्याबाबत ट्वीट केलं आहे. भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपला घेऊन सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉन्च झालेला Koo भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे मायक्रोब्लॉगिंगचा अनुभव देतं.

सरकारकडून Koo ला प्राधान्य

त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, काही सरकारी विभागांनी स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट Kooवर आपलं खातं सुरु केलं आहे. काही ट्वीट आणि खात्यांवर निर्बंध लादण्याच्या सरकारचे आदेश ट्विटरकडून पाळण्यात आला नाही. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. Koo ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर (NIC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या हँडल सुरु करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

WhatsApp नव्हे ‘या’ अ‍ॅपचा जगभरात बोलबाला, तब्बल 60 कोटी युजर्सची पसंती

भारतात UPI Transactions मध्ये WhatsApp पेमेंट पिछाडीवर, PhonePe, Google Pay ची बाजी

257 Twitter accounts to be cracked down on, central government orders Twitter

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.