डोनाल्ड ट्रम्पचं ट्विटर सस्पेंड करणाऱ्या विजया गड्डेचं मराठी कनेक्शन? वाचा सविस्तर

विजय गड्डे यांनीच अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते रद्द करण्याचा निर्णय घेतला. (Vijaya Gadde Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्पचं ट्विटर सस्पेंड करणाऱ्या विजया गड्डेचं मराठी कनेक्शन? वाचा सविस्तर
विजया गड्डे

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या कॅपिटल बिल्डींगमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)समर्थकांनी हिंसा केली होती. ट्विटरनं (Twitter) अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामध्ये ट्विटरमधील भारतीय वशांची महिला अधिकारी विजय गड्डे (Vijay Gadde) यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. विजया गड्डे या ट्विटरमध्ये कायदे आणि धोरण ठरवणाऱ्या समितीच्या प्रमुख आहेत. विजया गड्डे यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या आडनावावरून त्या मराठी कुटुंबातील असाव्यात अशा सुरु आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.  (Vijaya Gadde Indian American who suspend Donald Trump Twitter Account )

ट्विटरनं शुक्रवारी (8 जानेवारी) डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खाते सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत हिंसात्मक घटना होऊ नयेत म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्याचे परिक्षण करण्यात आलं आहे. यानंतर ट्रम्प यांना ट्विटरकडून इशारा देण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भविष्यात नियम मोडल्यास अकाऊंट सस्पेंड करण्यात येईल असा, इशारा देण्यात आलेला. मात्र, हिंसक घटनांची शक्यता घेता ट्रम्प यांचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं. यामध्ये विजया गड्डे यांची भूमिका महत्वाची राहिली.

विजया गड्डेंचा जन्म भारतात

विजया गड्डे यांच्यावर ट्विटरचे नियम बनवणे आणि लागू करण्याची जबाबदारी आहे. त्या ट्विटरच्या लीगल आणि पॉलिसी मेकींग टीमच्या प्रमुख आहेत. विजया गड्डे यांचा जन्म भारतात झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब अमेरिकेला गेले. गड्डे यांनी न्यू जर्सीमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. गड्डे यांचे वडील मेक्सिकोतील तेल संशोधन कंपनीत केमिकल इंजिनीअर म्हणून काम करत होते. विजया गड्डेंनी कार्नेल विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लॉस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. विजया गड्डे यांनी दहा वर्ष लॉ फर्ममध्ये काम केले. 2011 पासून विजया गड्डे ट्विटरसोबत काम करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दलाई लामांची भेट

नोव्हेंबर 2018 मध्ये ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोरसे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी विजया गड्डे देखील भारतात आल्या होत्या. विजया गड्डे आणि जॅक डोरसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दलाई लामा यांची भेट घेतली होती.

विजया गड्डे जग बदलणाऱ्या 50 महिलांच्या यादीत

InStyle मासिकाच्या जग बदलणाऱ्या पहिल्या 50 जणांच्या यादीमध्ये विजया गड्डे यांचा समावेश करण्यात आला आहे. विजया गड्डे ट्विटरशिवाय गद्दे एंजेल्सच्या सहसंस्थापक आहेत. 2020 च्या अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्विटरवर राजकीय प्रचार आणि जाहिराती लावता येणार नाहीत, असा निर्णय विजया गड्डेंनी घेतला होता.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करणाऱ्या विजया गड्डे यांच्या आडनावावरुन त्या मराठी कुटुंबातील असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, विजया गड्डे यांचं आडनाव मराठी आडनावाशी जुळणारं असल्यामुळे चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप याबाबत अधिक माहिती समोर आलेलनी नाही.

संबंधित बातम्या:

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसचं दिसणं कुणाला, का खटकतंय?

जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षाचं ट्विटही हटवलं जातं..

(Vijaya Gadde Indian American who suspend Donald Trump Twitter Account)

Published On - 6:49 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI