
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ वर पोस्ट करुन फार्मा सेक्टरवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी हे टॅरिफ ब्रांडेड आणि पेटेंट फार्मा इंपोर्टवर लावलं आहे. यानंतर भारताच फार्मा सेक्टर आणि त्यांच्याकडून अमेरिकेला होणारी निर्यात चर्चेचा विषय बनली आहे. ट्रम्प यांच्याकडून फार्मा सेक्टरवर लावलेला टॅरिफ 1 ऑक्टोंबरपासून लागू होणार आहे. भारत अमेरिकेला कोण कोणत्या औषधांची निर्यात करतो. कोणत्या औषधांवर टॅरिफ लागणार, जाणून घ्या.
भारत जगातील मोठ्या औषध निर्यातदारांपैकी एक आहे. भारतातून अमेरिकेला जेनेरिक आणि ब्रांडेड दोन्ही प्रकारची औषध जातात. त्याशिवाय भारतीय फार्मा कंपन्या अमेरिकेशिवाय युरोप आणि दुसऱ्या देशांना सुद्धा लस निर्यात करतात. ट्रम्प यांचा टॅरिफ केवळ ब्रांडेड औषधांवर लागू होणार आहे. म्हणजे जेनरिक औषधांची आधीप्रमाणेच निर्यात सुरु राहिलं.
भारतातून कुठली जेनेरिक औषधं अमेरिकेला निर्यात होतात?
अमेरिकेत भारतीय फार्मा कंपन्यांकडून सर्वाधिक जेनेरिक औषधांची निर्यात होते. cureton.in च्या रिपोर्ट्नुसार भारतातून जेनेरिक औषध सर्वात जास्त निर्यात होतात. यात पॅरासिटेमॉल आहेत. त्याशिवाय जेनेरिक औषधांमध्ये आयबुप्रोफेन, मेटफार्मिन, एटोरवास्टेटिन (कोलेस्ट्रॉल कमी करणारं औषध) आणि ओमेप्राजोल (एसिड रिफ्लेक्स आणि अल्सरच औषध) ही औषधं एक्सपोर्ट होतात.
जेनेरिक औषधांशिवाय कुठली औषधं अमेरिका आयात करते?
जेनेरिक औषधांशिवाय अमेरिका भारताकडून अनेक जीवन रक्षक ब्रांडेड औषध आयात करतो. यात एंटीबायोटिक, हार्ट संबंधी औषध, डायबिटीजची औषधं, पेन किलर, कॅन्सरची औषध आहेत. एंटीवायरसमध्ये एचआयवी औषधं आणि वॅक्सीन आयात याचा समावेश होतो. कोविडच्यावेळी भारत सरकारने काही औषधांच्या निर्यातीवर बंदी आणली होती. जेणेकरुन आवश्यक औषधांचा साठा भारतात उपलब्ध रहावा.
ब्रांडेड औषध कुठल्या कंपन्या बनवतात?
भारतीय फार्मा कंपन्यांच्या वार्षिक निर्यातीबद्दल बोलायच झाल्यास भारतीय फार्मा कंपन्या वर्षाला 25 अब्ज डॉलर्सची औषधं परदेशात निर्यात करतात. यात सर्वात जास्त औषध निर्यात अमेरिकेत होते. त्यानंतर ब्रिटन, जर्मनी, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये भारतीय फार्मा कंपन्या एक्सपोर्ट करतात. भारतीय औषध कंपन्यांबद्दल बोलायच झाल्यास सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सिप्ला, ल्यूपिन, अरबिंदो फार्मा आणि ज़ाइडस लाइफसाइंसेज या प्रमुख कंपन्या ब्रांडेड औषध बनवतात.