भारताला 52 सॅटलाईटच्या प्रोजेक्टला स्पीड देण्याची गरज, कारण पाकिस्तान चीनच्या मदतीने अवकाशात..CDS कडून मोठी वॉर्निंग

नवी दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनमध्ये 'विमर्श ऑन फ्यूचर ऑफ वारफेयर एंड इंडियाज प्रिपेयर्डनेस टू कंडक्ट मल्टी-डोमेन ऑपरेशंस' कार्यक्रमात जनरल सुब्रमणी यांनी अंतराळ युद्धाच्या बदलत्या आव्हानांवर बोलताना चीन आणि पाकिस्तान मैत्री विषयी भीती व्यक्त केली आहे.

भारताला 52 सॅटलाईटच्या प्रोजेक्टला स्पीड देण्याची गरज, कारण पाकिस्तान चीनच्या मदतीने अवकाशात..CDS कडून मोठी वॉर्निंग
SPACE WAR WITH PAK AND CHINA
| Updated on: Nov 28, 2026 | 7:21 PM

ऑपरेशन सिंदुर दरम्यान भारताला पाकिस्तानशी लढताना अनेक विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला होता. कमजोर पाकिस्तानला चीनने आपले उपग्रहांचे नेटवर्क वापरु दिले होते आणि तुर्की शस्रे पाकिस्तानच्या दिमतीला होती. भारत एकाच वेळी तीन देशांशी लढत होता. आता युद्धाचा नवी आघाडी अंतराळात सुरु होण्याची शक्यता आहे. कारण चीन अंतराळ क्षमता सातत्याने वाढवत आहे. आणि त्याच्या मदतीने आता पाकिस्तान देखील अंतराळात वेगाने प्रगती करण्यासाठी आसुसला आहे. हे भारतासाठी मोठे संकट असल्याचे मानले जात आहे.

भारताची सुरक्षा धोरण आता केवळ जमीन, समुद्र आणि आकाशापर्यंत मर्यादित राहिलेले नाही. आता नव्या जमान्याच्या युद्धाने अंतराळात आघाडी उघडली आहे. चीनने या दिशेने आघाडी घेतली असून तो पाकिस्तानलाही कडेवर घेऊन उभा असल्याने भारताची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Loading...

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी इशारा दिला आहे की पाकिस्तानच्या वाढत्या अंतराळ सामर्थ्यामुळे भारताला आपले सैन्य धोरण बदलावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे आव्हान पेलण्यासाठी भारताने आपल्या ५२ सॅटेलाईटची टेहळणी कार्यक्रमाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे.

ते म्हणाले की पाकिस्तान त्यांची अंतराळ क्षमता चीनच्या मदतीने चांगली करत आहे. पाकिस्तान त्यांची अंतराळ संघटना SUPARCO (Space and Upper Atmosphere Research Commission) देखील स्वदेशी क्षमता विकसित करण्याच्या मागे लागला आहे.

येथे पोस्ट वाचा –

CDS जनरल एनएस राजा सुब्रमणी पुढे म्हणाले की तुर्किये देखील पाकिस्तानला मदत करतच आहे हे मानून चालायला हवे. चीनकडील ISR म्हणजे इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स आणि रिकॉन्सेंस आणि PNT म्हणजे पोझिशनिंग, नेव्हीगेशन आणि टायमिंगसारख्या क्षमतांचा लाभ पाकिस्तानला मिळू शकतो. याचा अर्थ पाकिस्तान भारतीय सैनिक अड्डे, सीमावर्ती कारवाया आणि सैन्य संसाधनाची टेहळणी करण्यात आता आधी पेक्षा खूप चांगल्या स्थितीत येऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us