याचना नहीं अब रण होगा… भारतीय सैन्याचा थेट इशारा, म्हणाले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमला भेदणं मुश्किल…

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पार्श्वभूमीवर, १२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ दरम्यान चर्चा झाली. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानी वायूसेनेवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

याचना नहीं अब रण होगा… भारतीय सैन्याचा थेट इशारा, म्हणाले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमला भेदणं मुश्किल...
dgmo press conference
| Updated on: May 12, 2025 | 3:56 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अद्याप कायम आहे. आज म्हणजेच 12 मे रोजी या दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे. यापूर्वी भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती देण्यात आली. त्यासोबतच आजच्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानी वायूसेनेला कसं पाणी पाजलं, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी याचना नही रण होगा… जीवन जय या मरण होगा असे म्हटले.

भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. “पुढची लढाई वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत”, असे राजीव घई म्हणाले.

मला बोलायची गरज नाही

“याचना नही रण होगा… जीवन जय या मरण होगा.. अशी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची कविता राजीव घई यांनी दाखवली. काय संदेश देत आहोत. रामचरित मानसची ओळ आहे. तुम्ही समजून जाल. विनय न माने जलधि-जड़, गए तीन दिन बीत,. बोले राम सकोप तब भय बिनु होय न प्रीत. याचा अर्थ समजदार के लिए इशारा काफी है. कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी आली तरी तिला सामना करण्यास आम्ही तयार आहोत. मला बोलायची गरज नाही. तुम्ही स्वत पाहिलं आहे”, असेही राजीव घई यांनी सांगितले.

“पुढची लढाई झाली तर वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत”, असेही राजीव घईंनी म्हटले.

दहशतवाद्यांची कारवायांची पद्धत बदलली

“आमची लढाई ही दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होती. त्यामुळे आम्ही 7 मे रोजी फक्त दहशतवाद्यांवर हल्ला केला. पण दुर्दैव म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. गेल्या बऱ्याच वर्षांपासून लष्कर तसेच सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात आले. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांची कारवायांची पद्धत बदलली आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पहलगाम येथील पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. पहलगामपर्यंत या पापाचा घडा भरला होता,” असं राजीव घई यांनी सांगितलं.