AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या देशभरात मॉक ड्रिल; ब्लॅकआऊट कसा असेल? काय काळजी घ्याल? वाचा A टू Z माहिती

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे, केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ल्याचा मॉक ड्रिल आयोजित केला आहे. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, सायरनचे संचालन आणि ब्लॅकआऊटची प्रक्रिया स्पष्ट केली जाईल.

उद्या देशभरात मॉक ड्रिल; ब्लॅकआऊट कसा असेल? काय काळजी घ्याल? वाचा A टू Z माहिती
india blackout
| Updated on: May 06, 2025 | 9:15 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. भारत पाक सीमेवर युद्धाचे ढग जमा झालेले असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या बुधवारी (7 मे) देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल (Mock Drill) आयोजित करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचलली जात आहेत. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी काय करावे, याबद्दलच्या उपायांची माहिती दिली जाणार आहे.

या मॉक ड्रिलदरम्यान देशभरात सायरन वाजवले जाणार आहेत. केंद्र सरकारने सर्व सहभागी राज्यांना त्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षितता योजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणाऱ्या सायरनचे संचालन आणि हल्ल्याच्या परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि ते कसे असेल?

मॉक ड्रिलदरम्यान सर्वत्र ब्लॅकआऊट (Blackout) केला जाईल. ब्लॅकआऊट म्हणजे अंधार करणे. याचा अर्थ असा की, जेव्हा ब्लॅकआऊटचा आदेश येईल. तेव्हा शहरातील सर्व लाईट्स बंद केल्या जातील. रात्रीच्या वेळी सायरन वाजल्यानंतर सर्वत्र अंधार केला जाईल. ब्लॅकआऊट करण्याचे मुख्य कारण म्हणजे शत्रूला त्याचे लक्ष्य शोधण्यात अडचण निर्माण करणे, असे असते. या ब्लॅकआऊटदरम्यान सर्वसामान्यांनी काय करावे, याबद्दल भारत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यात नागरिकांनी युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे, याबद्दलची माहिती दिली आहे.

ब्लॅकआऊट झाल्यावर काय कराल?

  • जेव्हा तुम्हाला सायरन ऐकायला येईल, तेव्हा लगेचच घरातील सर्व दिवे, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे बंद करा.
  • तुमच्या घरात मेणबत्ती, दिवा यांसह इतर कोणत्याही प्रकाशाचा एक छोटासा किरण दिसणे देखील महागात पडू शकते.
  • कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. शांतता आणि संयम राखा, परिस्थितीचा सामना करा.
  • जर शक्य असेल तर घरातील सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणजे जिथे बाहेरून हल्ला होण्याची शक्यता कमी असेल अशा ठिकाणी आश्रय घ्या.
  • आपल्या घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवा. त्यांना धीर द्या.
  • आपल्या आजूबाजूच्या लोकांची विचारपूस करा आणि त्यांना मदत करा.
  • सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी सरकारी सूचनांचे पालन करा.

नागरिकांनी सक्रियपणे सहभागी व्हावे

उद्या होणारे मॉक ड्रिल केवळ एक सराव आहे. परंतु यामुळे भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला या सूचना उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे याला गांभीर्याने घ्या आणि सहकार्य करा. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.