
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने काही कठोर निर्णय घेतले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. भरताने पाकिस्तानशी असलेले सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या तणावाचा भारतातील काही वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जर भारताने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली किंवा व्यापारी संबंध संपवले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार आणि हालचालींचे दोन प्रमुख मार्ग, अटारी आणि वाघा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर नक्कीच होऊ शकतो.
भारत पाकिस्तानकडून अनेक वस्तू खरेदी करतो. दोन्ही देशांमधील व्यापार पूर्णपणे थांबला तर केवळ पाकिस्तानच अडचणीत येईल असे नाही तर भारतातही अनेक गोष्टी महाग होऊ शकतात. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या महाग होऊ शकतात.
कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात
सैंधव मीठ
व्यापारातील स्थिरतेमुळे महाग होणारी पहिली वस्तू असू शकते सैंधव मीठ. भारतात येणारे सैंधव मीठ फक्त पाकिस्तानमधून येतं. भारतात उपवास आणि सणांमध्ये सैंधव मीठ मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबला तर हे मीठाच्या किंमती वाढू शकतात.
सुकामेवा
भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सुकामेवा खरेदी करतो. सर्व व्यवहार बंद झाल्यास भारतात सुक्या मेव्याच्या किंमती वाढू शकतात. तथापि, भारत फक्त पाकिस्तानमधून सुकामेवा आयात करत नाही. यासाठी भारताकडे अनेक पर्यायही आहेत.
ऑप्टिकल लेन्स: चष्मा उद्योगावर परिणाम
भारत पाकिस्तानमधून चष्म्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स आणि काही कच्चा माल देखील आयात करतो . कमी बजेट असलेल्या चष्मा उत्पादकांसाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. जर आयात थांबली तर अल्पावधीत किमती वाढू शकतात .
बांधकाम साहित्य: सिमेंट, दगड आणि चुना
सिमेंट, दगड आणि चुना यांसारखी उत्पादने पाकिस्तानमधून सीमावर्ती भागात आणली जातात आणि ग्रामीण भागात आणि सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरली जातात. तसेच चामड्याच्या वस्तू देखील आयात करतो. पण भारताकडे यासाठी देशांतर्गत पर्याय आहेत. परंतु लॉजिस्टिक्स खर्च आणि पुरवठा साखळीत काही अस्थिरता असू शकते, त्यामुळे याही वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
चामडे आणि पारंपारिक कपडे
पाकिस्तानातील हस्तनिर्मित चामड्याच्या वस्तू आणि पारंपारिक कपडे , विशेषतः भरतकाम केलेले कापड आणि दुपट्टे, यांना भारतीय फॅशन आणि बुटीक बाजारात मोठी मागणी आहे. जर व्यवसाय थांबला तर लहान व्यापाऱ्यांना आणि बुटीक क्षेत्राला त्याचा फटका बसू शकतो.
भारतासाठी इतर पर्याय
ग्राहक पाकिस्तानमधून आयात केलेल्या वस्तूंऐवजी भारत किंवा इतर देशांमधून आयात केलेल्या पर्यायांचा वापर करू शकतात. स्थानिक पातळीवर उत्पादित वस्तूंचा वापर करून देशांतर्गत उद्योगांना पाठिंबा देण्याची ही एक संधीही आहे. वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता लक्षात त्यानुसार खर्चाचे नियोजनही आखता येणे शक्य आहे.
एकंदरीत, कोणाचे जास्त नुकसान होणार?
भारताकडून महत्त्वाच्या वस्तू पाकिस्तानमध्ये निर्यात होतात. जसं की औषधे, चहा, कॉफी आणि मसाले, कापूस आणि कापड उत्पादने अशा अनेक महत्वपूर्ण वस्तू, दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तू भारतातून पाकिस्तानमध्ये जातात. त्यामुळे हे व्यापारी व्यवहार बंद झाल्यानंतर तणावामुळे पाकिस्तानला सर्वात जास्त नुकसान होईल असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे . भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण आहे, तर पाकिस्तान आधीच आर्थिक मंदी, महागाई आणि राजकीय संकटांशी झुंजत आहे. त्यामुळे भारतात नुकसान मर्यादित आणि तात्पुरते असेल , पण पाकिस्तानमध्ये त्याचा दीर्घकालीन आर्थिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतो .