
सकाळची वेळ, रोजच्याप्रमाणे सर्वांचा रेडिओ सुरू होता. रेडिओ उद्घोषकाऐवजी आकाशवाणीवर देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी बोलत होत्या राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. काळजी करण्यासारखे काही नाही…’ इंदिरा गांधीचे हे शब्द सर्वांच्या कानावर पडले. आणीबाणी हा शब्द ऐकून सर्व देशातील जनता थक्क झाली. येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडणार याची सामान्य माणसाला कल्पना नव्हती. 25 जून 1975 आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जून 1975 ला सकाळी इंदिरा गांधींनी देशातील जनतेला याबद्दल माहिती दिली. ‘आणीबाणी’आधी देशातील परिस्थिती 1974 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं. युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. कारण देशात महगाई वाढली होती. काँग्रेस पक्षामधील भ्रष्टाचार समोर येऊ लागला होता. या साली गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचा मोठा भ्रष्टाचार समोर आला होता. या घोटाळ्यानंतर चिमनभाई पटेल चिमनचोर म्हणून म्हटलं जात होतं. यावेळी गुजरातमधील जनता रस्त्यावर उतरली आणि सरकार...