मोठी बातमी! भारताचा अमेरिकेला मोठा झटका; जे डोनाल्ड ट्रम्प यांना जमलं नाही ते भारताना करून दाखवलं, अखेर युद्ध थांबणार
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेकडून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना काही यश आलं नाही, मात्र अमेरिकेला जे जमलं नाही, ते आता भारताने करून दाखवलं आहे. भारताकडून युद्धविरामाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, या युद्धामध्ये आतापर्यंत युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनकडून देखील रशियावर मोठे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये रशियामधल्या देखील पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु त्यामध्ये त्यांना काही यश आलं नाही. अजूनही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनसोबतचं युद्ध थांबवलं नाही म्हणून ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक निर्बंध देखील लादले होते, परंतु त्यात देखील त्यांना यश आलं नाही. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं आहे.
भारताकडून युक्रेन आणि रशियाला युद्ध थांबवण्यासाठी सिझफायरचा एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, त्यामुळे आता लवकरच हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव यांनी बुधवारी सांगितलं की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी भारत जे योगदान देत आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. तर दुसरीकडे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील भारताने पाठवलेल्या या युद्धबंदीच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे, आमच्याकडे युद्धबंदीचे चार प्रस्ताव आले आहेत, मात्र त्यातील सर्वात योग्य आणि व्यापक प्रस्ताव आम्हाला भारताचा वाटत असल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.
भारताच्या प्रस्तावामध्ये काय आहे?
भारताने रशिया आणि युक्रेनला दिलेला सिझफायरचा प्रस्ताव हा संवेदनशील आर्थिक मुद्द्यांवर केंद्रीय आहेत. भारताकडून रशिया आणि युक्रेनला युद्ध थांबवण्यासाठी तीन सुत्रीय कार्यक्रम देण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही देशांकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं असून, रशिया आणि युक्रेनने भारताच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे आता हे युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता आहे.