Corona Cases India | देशातील नवे कोरोनाग्रस्त चार लाखांच्या उंबरठ्यावर, 24 तासात 3689 कोरोनाबळी

| Updated on: May 02, 2021 | 10:30 AM

देशात गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 689 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (India Reports 3 Lack 92 Thousands 488 New COVID-19 Cases).

Corona Cases India | देशातील नवे कोरोनाग्रस्त चार लाखांच्या उंबरठ्यावर, 24 तासात 3689 कोरोनाबळी
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 689 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 95 लाख 57 हजार 457 वर गेली आहे. तर एकूण कोरोनाबळींचा आकडा 2 लाख 15 हजार 542 झाला आहे (India Reports 3 Lack 92 Thousands 488 New COVID-19 Cases 3689 Deaths In The Last 24 Hours).

देशातील नवे कोरोनाग्रस्त चार लाखांच्या उंबरठ्यावर आहेत. देशात गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 कोटी 95 लाख 57 हजार 457 वर गेली आहे. त्यापैकी 33 लाख 49 हजार 644 सध्या सक्रिय (अॅक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. 1 कोटी 59 लाख 92 हजार 271 रुग्ण कोरोना उपचारानंतर बरे झालेले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत भारतात 2 लाख 15 हजार 542 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. गेल्या 24 तासात 3 हजार 689 कोरोनाग्रस्तांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

देशातील एकूण आकडेवारीवर नजर :

भारतातील एकूण कोरोनाग्रस्त : 1 कोटी 95 लाख 57 हजार 457
कोरोना उपचारानंतर बरे झालेले एकूण रुग्ण : 1 कोटी 59 लाख 92 हजार 271
देशातील एकूण कोरोनाबळी : 2 लाख 15 हजार 542
देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण : 33 लाख 49 हजार 644

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून, रुग्ण संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात कडक निर्बंध असतानाही दररोज 60 हजारांवर रुग्ण सापडत आहेत. राज्या गेल्या 24 तासांत 63,282 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झालेय. राज्यात एकूण 6,63,758 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 46,65,754 झालीये. तर राज्यात गेल्या 24 तासांत 802 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 % एवढा आहे.

दिल्लीमध्ये आणखी एका आठवड्यासाठी लॉकाडाऊन वाढवला

मागील अनेक दिवसापासून कोरोनाच्या दुसरी लाट हाहा:कार माजवते आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. दिल्लीमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे येथे ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आणखी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी ट्विट करुन तशी माहिती दिली आहे.

India Reports 3 Lack 92 Thousands 488 New COVID-19 Cases 3689 Deaths In The Last 24 Hours

संबंधित बातम्या :

राज्यात आज 63,282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 802 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Corona Cases India | देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी

राज्यात 69,710 कोरोनाबाधित बरे, तर 62,919 नवे रुग्ण सापडले