Corona Cases India | देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे (India new COVID19 cases)

Corona Cases India | देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी
corona

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. 3 हजार 523 कोरोनाग्रस्तांना कालच्या दिवसात प्राण गमवावे लागले. एकूण कोरोनाबळींचा आकडा 2 लाख 11 हजार 853 झाला आहे. (India reports 401993 new COVID19 cases 3523 deaths and 299988 discharges in the last 24 hours)

देशात 24 तासात चार लाखांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचा विक्रम नोंद झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. त्यापैकी 32 लाख 68 हजार 710 सध्या सक्रिय (अॅक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण कोरोना उपचारानंतर बरे झालेले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत भारतात 2 लाख 11 हजार 853 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. गेल्या 24 तासात 3 हजार 523 कोरोनाग्रस्तांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

देशातील एकूण आकडेवारीवर नजर :

भारतातील एकूण कोरोनाग्रस्त : 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 कोरोना उपचारानंतर बरे झालेले एकूण रुग्ण : 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 देशातील एकूण कोरोनाबळी : 2 लाख 11 हजार 853 देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण : 32 लाख 68 हजार 710

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात कालच्या दिवसात (30 एप्रिल 2021) 62,919 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे निदान झाले. तर राज्यात 828 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.5% एवढा आहे. राज्यात सध्या 6,62,640 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 46,02,472 झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात काल 69,710 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात  एकूण 38,68,976 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.06 % एवढे झाले आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात 69,710 कोरोनाबाधित बरे, तर 62,919 नवे रुग्ण सापडले

(India reports 401993 new COVID19 cases 3523 deaths and 299988 discharges in the last 24 hours)

Published On - 9:43 am, Sat, 1 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI