AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चीनसोबत पुन्हा तणाव? भारतानं 50 हजार अतिरिक्त सैन्य चीन सीमेवर पाठवलं, ऐतिहासिक निर्णय

भारताने चीन सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. जवळपास 50,000 अतिरिक्त सैनिक भारत-चीन सीमेकडे हलवण्यात आले आहेत.

मोठी बातमी! चीनसोबत पुन्हा तणाव? भारतानं 50 हजार अतिरिक्त सैन्य चीन सीमेवर पाठवलं, ऐतिहासिक निर्णय
चीन-भारत बॉर्डर
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 28, 2021 | 11:48 PM
Share

नवी दिल्ली : भारताने चीन सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. जवळपास 50,000 अतिरिक्त सैनिक भारत-चीन सीमेकडे हलवण्यात आले आहेत. भारताच्या या निर्णयाने चीनला चांगलीच धडकी भरलीय. चीनकडून सातत्याने होणारं अतिक्रमण आणि आक्रमक कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारताने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. भारताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच चीन सीमेवरील तणावाला पाकिस्तान सीमेपेक्षाही अधिक महत्त्व दिलंय. याआधी 1962 मध्ये भारत चीनमध्ये युद्ध झालं असलं तरी यावेळचा हा निर्णय मोठा मानला जात आहे (India shift 50,000 thousand additional soldiers to China border).

गलवान खोऱ्यात मागील दशकातील सर्वात धोकादायक झडप भारत-चीनमध्ये पाहायला मिळालीय. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपलं लक्ष्य पाकिस्तानवरुन चीनवर केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी भारत-पाकिस्तानमध्ये देखील 3 घातक युद्ध झाली आहेत. मात्र, यावेळी भारताने आपला पारंपारिक शत्रू पाकिस्तानपेक्षाही अधिक लक्ष चीनवर दिलंय. त्याचाच भाग म्हणून मागील काही महिन्यात भारतानेही चीनला प्रत्युत्तर देत सीमेवर आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठीच मागील काळात भारताने सीमेवर 20,000 सैनिकांची तैनाती केली. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे. सध्या हा आकडा 50,000 वर गेलाय.

भारताकडून सैन्याला बचावासाठी आक्रमक होण्याचे निर्देश

भारतीय सैन्य किंवा सरकारच्या प्रवक्त्यांनी यावर बोलण्यास सध्या तरी नकार दिलाय. दरम्यान, याआधी भारतानेही चीनची कोंडी करण्यासाठी काही पावलं उचललं होती. त्याचाच भाग म्हणून सैन्याच्या अधिकाऱ्यांना बचावासाठी आक्रमक होण्याची मूभा देताना गरज पडल्यास चीनच्या भागावर नियंत्रणाचीही सूट देण्यात आलीय. त्यासाठी भारताने या भागात तोफांसह हेलिकॉप्टरची तैनातीही वाढवली. यामुळे सैनिकांना एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात हालचाल करण्याचीही सोपं होणार आहे.

चीनकडून सीमेवर किती सैन्य तैनात?

दुसरीकडे चीनने मागील काही काळापासून भारत सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती वाढवलीय. मात्र, ही संख्या नेमकी किती आहे याची कोणतीही माहिती सध्या तरी उपलब्ध नाहीये. असं असलं तरी चीन तिबेटच्या बाजूने सैन्य तैनाती वाढवत असल्याचं भारतीय सैन्याच्या लक्षात आलंय. याशिवाय चीनकडून सीमेवर रस्ते, रेल्वेजाळं आणि बुलेटप्रुफ बंकर्स अशा मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या केल्या जात आहे.

हेही वाचा :

सरकारनं चीनच्या सैनिकांना सीमेवर रोखण्याऐवजी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवलं: राहुल गांधी

LAC वरच्या सैनिकांचा आत्मविश्वास हिमालयाएवढा; फक्त आदेशाची गरज : लष्करप्रमुख नरवणे

चीनला धोबीपछाड कसा द्यायचा? वाचा गडकरी फॉर्म्युला

व्हिडीओ पाहा :

India shift 50,000 thousand additional soldiers to China border

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?