डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा जबरदस्त हादरा, 27 देशांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय बाजारातून देशासाठी मोठी बातमी

भारताला 500 टक्के टॅरिफची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारतानं मोठा धक्का दिला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली असून, 27 देशांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अडचणी वाढू शकतात.

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा जबरदस्त हादरा, 27 देशांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय बाजारातून देशासाठी मोठी बातमी
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 12, 2026 | 3:43 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा गेल्या ऑगस्टमध्ये केली होती. दरम्यान त्यामुळे आता अमेरिकेत भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे. अमेरिकेनं लावलेल्या या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारत यांच्यामधील संबंध ताणले गेले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारतानं चीन आणि रशियात आपली निर्यात वाढवल्यामुळे भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे, हाच आता अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेत मोठी ट्रेड डिल होणार होती, मात्र सध्या तरी तीचा वेग मंदावल्याचं पहायला मिळत आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोन केला नाही, म्हणून ट्रेड डिल होऊ शकली नाही असा आरोप देखील अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

मात्र कायमच भारतावर दबाव निर्माण करू पहाणाऱ्या अमेरिकेला आता भारतानं चांगलाच धक्का दिला आहे. अमेरिकेसोबत होणारी भारताची ट्रेड डील जरी थंड बस्त्यात गुंडाळली गेली असली तरी देखील आता दुसरीकडे भारत आणि युरोपीयन संघ जगातील सर्वात मोठी व्यापारी डील करण्याच्या खूप जवळ पोहोचले आहेत. युरोपीय संघात सध्या स्थितीमध्ये एकूण 27 देश आहेत.फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची ब्रसेल्स येथे युरोपीयन यूनियनशी संबंधित महत्त्वाच्या नेत्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये युरोपीयन यूनियन सोबत भारत जी ट्रेड डिल करणार आहे, त्याचं अंतिम स्वरुप कसं असेल यावर चर्चा करण्यात आली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार आता ही डील अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान या हालचाली वाढण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेनं सुरू केलेलं टॅरिफ वॉर असल्याचं देखील बोललं जात आहे. अमेरिकेनं अनेक देशांवर टॅरिफ लादला आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर मोठा दबाव पहायला मिळत आहे, त्यामुळे आता युरोपीयन युनियन देखील या ट्रेड डिलसाठी उत्सुक आहे, लवकरच भारत आणि युरोपीयन संघामध्ये जगातील सर्वात मोठी व्यापारी डील झाल्याचं पहायला मिळू शकतं, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असणार आहे.