ब्रह्मोसपेक्षाही घातक, रडारला देणार चकवा, भारत करणार K-6 क्षेपणास्राची चाचणी, चीनला इशारा

जगात मोजक्या देशांकडे एडव्हान्स हायपरसॉनिक आणि MIRV-इक्विप्ड मिसाईल सिस्टम आहे किंवा ते यास विकसित करीत आहेत. यात अमेरिका, रशिया, चीन आणि युनायटेड किंगडम आणि आता भारताचा K-6 मिसाईलच्या यशस्वी समुद्री चाचणीनंतर समावेश होणार आहे.

ब्रह्मोसपेक्षाही घातक, रडारला देणार चकवा, भारत करणार K-6 क्षेपणास्राची चाचणी, चीनला इशारा
K-6 मिसाईल
| Updated on: Jun 30, 2025 | 6:37 PM

भारत त्याच्या K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्राची समुद्रात चाचणी घेणार आहे. या क्षेपणास्राला डीआरडीओने तयार केले आहे. हे क्षेपणास्राला भागाच्या आगामी S-5 क्लासच्या न्यूक्लीअर पाणबुडीत तैनात करण्याची भारताची योजना आहे. या आंतरखंडीय बॅलेस्टीक मिसाईल K-6 चा वेग आणि रेंज ब्रह्मोस क्षेपणास्रापेक्षाही जादा आहे. हे क्षेपणास्र भारताला पाकिस्तान आणि चीनसारख्या देशाशी मुकाबला करण्यास मदत करतात.

हैदराबाद स्थित डीआरडीओच्या एडव्हान्स नेव्हल सिस्टीम्स लॅबोरेटरीत K-6 विकसित केले जात आहे. भारतातील सर्वात उन्नत आणि घातक क्षेपणास्रापैकी एक आहे. आण्विक पाणबुडीतून लाँच केल्या जाणाऱ्या या हायपरसॉनिक बॅलेस्टीक मिसाईलमुळे भारत जगातील मोजक्या देशांच्या पक्तींत जाऊन बसणार आहे. S-5 क्लासच्या न्युक्लिअर सबमरीनमधून K-6 मिसाईल लाँच केले जाणार आहे.सध्या अरिहंत क्लासच्या सबमरीनहून ही पाणबुडी मोठी आणि अधिक शक्तीशाली असणार आहे. या आण्विक पाणबुडीला घातक वॉरहेड आणि क्षेपणास्र कॅरी करण्यासाठी विकसित केले जात आहे.

K-6 चा वेग 9200 KM प्रति तास

K-6 क्षेपणास्राचा वेग 7.5 मॅक म्हणजे ध्वनीच्या ( साडे सात पट जादा ) असणार आहे. म्हणजे हे क्षेपणास्र दर तासाला 9,200 किलोमीटर प्रति तास वेगाने उडणार आहे.म्हणजे या मिसाईलची रेंजही 8,000 किलोमीटर आहे. या अर्थ डोळ्यांची पापणी लवते न लवते हे क्षेपणास्र शत्रूच्या मुलखात खोलवर हल्ला करु शकते. या मिसाईलच्या प्रचंड वेगामुळेच हे मिसाईल एण्टी मिसाईल डिफेन्स सिस्टीमना चकवा देऊ शकते. त्यामुळे शत्रूला प्रतिक्रीया द्यायला सवडच मिळणार नाही.

MIRV तंत्रज्ञानाने K-6 मिसाईल सुसज्ज

K-6 मिसाईलमध्ये मल्टीपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हीईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे.त्यामुळे एकच मिसाईल अनेक टार्गेटना अचूकपणे निशाणा करु शकते. हे मिसाईल न्युक्लिअर आणि पारंपारिक दोन्ही प्रकारचे वॉरहेड कॅरी करु शकते. विविध प्रकारच्या युद्धासाठी त्यास तयार केले आहे. भारताकडे असलेल्या पाणीबुडीवरुन डागता येणाऱ्या बॅलेस्टीक मिसाईल वा एसएलबीएम सारख्या K-4 ( 3,500 किलोमीटरची रेंज ) आणि K-5 (6,000 किलोमीटर पर्यंत )चे अपग्रेटड व्हर्जन आहे.