AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून अमेरिकाच मोठा गेम, घेतला ऐतिहासिक निर्णय, ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. यातच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे.

भारताकडून अमेरिकाच मोठा गेम, घेतला ऐतिहासिक निर्णय, ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 18, 2025 | 7:58 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर अमेरिकेत 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिका आणि भारतामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. एकीकडे अमेरीका आणि भारतामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, मात्र दुसरीकडे चीन आणि रशिया यांच्यासोबत भारताची जवळीक वाढताना दिसत आहे.

दरम्यान आता भारतानं अमेरिकेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतानं एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारताकडून एक अधिकृत पत्रिपत्रक जारी करण्यात आले आहे, ज्यानुसार आता ब्रिक्स देशांना त्यांचे सर्व व्यापार पूर्णपणे रुपयांध्ये सेटल करण्याची परवानगी मिळाली आहे. भारताच्या या पावलामुळे डॉलरला हादरा बसण्याची शक्यता आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे, ज्यानुसार आता बँकांना पूर्वपरवानगिशिवाय अधिक व्होस्ट्रो खाती उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या बँका आता देशांच्या आयात-निर्यात व्यवसायांना विशेष व्होस्ट्रो खात्यांद्वारे रुपयांमध्ये व्यापार करण्याची परवानगी देऊ शकतात. भाराताच्या या निर्णयामुळे डॉलरला धक्का बसू शकतो. रुपयांची किंमत वाढेल असं मत अर्थ तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान दुसरीकडे भारताला टॅरिफच्या मुद्द्यावर चीनचं देखील समर्थन मिळताना दिसत आहे. ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर चीनने अमेरिकेला चांगलंच सुनावलं होतं. रशियाचं देखील भारताला समर्थन मिळताना दिसत आहे. रशिया, चीन, आणि भारत यांची वाढत असलेली जवळीक हा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे.  त्यातच आता भारतानं ब्रिक्स राष्ट्रांना रुपयांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी देऊन अमेरिकेला दुसरा मोठा धक्का दिला आहे. याचा मोठा फटका हा अमेरिकन डॉलरला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा दबाव झुगारून भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा