पाकिस्तानी शहरांमध्ये दहशत माजवणारा भारताचा ‘हार्पी ड्रोन’ किती शक्तीशाली, कसे करतो काम?

इस्त्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने हार्पी ड्रोन तयार केला आहे. हा पूर्णपणे अनमॅन्ड एरिअल व्हिकल आहे. ९ तास उड्डाण करण्याची त्याची क्षमता आहे. त्याचे ऑपरेशनल रेंज 200 किलोमीटर आहे. त्यामुळे शत्रूचा नायनाट करण्यासाठी त्याचा उपयोग होता.

पाकिस्तानी शहरांमध्ये दहशत माजवणारा भारताचा हार्पी ड्रोन किती शक्तीशाली, कसे करतो काम?
harop drones
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 09, 2025 | 6:48 AM

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे हताश झालेल्या पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर भारताने गुरुवारी पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला. तसेच भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट करण्यासाठी भारताने इस्रायली हार्पी ड्रोनचा वापर केला आहे. हार्पी ड्रोनमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. हे पाळत ठेवणे आणि धोकादायक क्षेपणास्त्र दोन्ही म्हणून काम करते. हा ड्रोन लक्ष्यावर फिरत राहतो आणि सापडताच थेट हल्ला करतो. ते किती शक्तिशाली आहे आणि ते विनाश कसे घडवते ते जाणून घ्या.

इस्त्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने हार्पी ड्रोन तयार केला आहे. हा पूर्णपणे अनमॅन्ड एरिअल व्हिकल आहे. ९ तास उड्डाण करण्याची त्याची क्षमता आहे. त्याचे ऑपरेशनल रेंज 200 किलोमीटर आहे. त्यामुळे शत्रूचा नायनाट करण्यासाठी त्याचा उपयोग होता. हार्पी ड्रोन आपल्या टार्गेटला शोधतो, ओळखतो अन् ट्रॅकींग करण्याचे काम ऑटोमॅटीक करतो. दोन पद्धतीने त्याचा डेटा लिंक करता येतो. त्यामुळे त्याचे ऑपरेशन सांभाळणाऱ्या व्यक्तीला रिअल टाईममध्ये योग्य निर्णय घेता येतो. युद्धाचा परिस्थितीती बदलल्यावर ऑपरेटर हल्ला रोखू शकतो. ड्रोनला माघारी परत बोलवू शकतो.

किती शक्तीशाली आहे हा ड्रोन

हार्पी ड्रोनमध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल, इंफ्रारेड आणि फॉरवर्ड लुकिंग इंफ्रारेड सेन्सर लावले आहे. तसेच त्याच्यात कलर सीसीडी कॅमरा आणि एंटी रडार होमिंग आहे. त्यामुळे त्याला टार्गेट शोधणे आणि कन्फर्मेशन मिळवणे सोपे होते. 23 किलोपर्यंतची स्फोटके तो नेऊ शकतो. त्याला एका कॅनिस्टरवरुन लॉन्च केले जाते. त्यामुळे ते तैनात करणे सोपे होते. विशेष म्हणजे त्यावर लक्ष ठेवणे सोपे आहे. हल्ला झाल्यास, ते पाळत ठेवण्याच्या पद्धतीवरून हल्ला करण्याच्या पद्धतीत बदलणे कठीण नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला. त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देत त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडारला लक्ष्य केले. लाहोरमधील एअर डिफेन्स प्रणाली निकामी केली.