लष्करातील निवृत्त अधिकाऱ्याने सोप्या शब्दांत समजवले ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तानमधील टेक्नोलॉजीचा दाखवला फरक
भारताच्या कारवाईनंतर खासदाराला संसदेत रडावे लागले. पाकिस्तानी आर्मीचे मनोबल सुद्धाखाली जायला सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर आपल्याला त्याचा फायदा होईल, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दहशतवादी आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केली. त्यानंतर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला चोख उत्तर देण्यात आले. या मोहिमेसंदर्भात निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती दिली.
निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. त्यात ऑपरेशन सिंदूरचा पार्ट वन झाला असला तरी ते ऑपरेशन निलंबित केले आहे, संपले नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने भारतातील पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला वाटले भारताने ज्याप्रमाणे हल्ला केला त्याप्रमाणे आपण उत्तर देऊ. परंतु आपल्या हवाई संरक्षण प्रणाली पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. कारण ही प्रणाली अत्याधुनिक होती. या प्रणालीने सर्व हल्ले परतवून लावले. आपल्याला त्याचे अवशेष मिळाले आहे. हे अवशेष आता जगासमोर मांडण्यात येतील. ते चिनी शस्त्रांचे पार्ट असणार आहे. मात्र भारताने त्याला कॅलिब्रेटेड रिस्पॉन्स दिला. आपण नकाशा बघितला तर पाकिस्तानने केलेले हल्ले आणि आपण केलेले हल्ले हे सीमेच्या जवळ आहे. गुजरातच्या भुजपर्यंत पाकिस्ताने 15 ठिकाणी हल्ले केले.
पाकिस्तानच्या हल्ल्यास उत्तर म्हणून भारताने लाहोरला सगळ्यात पहिले टार्गेट केल्याचे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, पाकिस्तानच्या पंजाबमधील एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा बंद झालेली होती. आपण ती नष्ट केली. आपल्या हल्ल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्याकडे असलेला हर्पी ड्रोन अतिशय प्रगत आहे. आपल्याकडं कार्बोनेट त्याच्यात भरून ते रिमोट कंट्रोलने अपडेट करता येते. त्यावर फक्त लक्ष ठेवावे लागते. जे आपण फीड केले आहे, त्याप्रमाणे ते जाऊन आपले काम करून येते. आपण आता टेक्नोवॉरमध्ये प्रवेश केला आहे. हे आता सिद्ध झाले आहे. टेक्निकली आपण पाकिस्तानपेक्षा खूप जास्त प्रगत आहोत. चीनने जे एअर डिफेन्स सिस्टीम त्यांना दिली आहे ती तेवढी प्रगत नाही. त्यामुळे आपल्याला याचा फायदा अरुणाचल आणि तिबेटमध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण चीनने त्या ठिकाणी हेच डीफेन्स सिस्टम लावली असू शकते. भारताने ड्रोन हल्ल्यात नागरी वस्तींना लक्ष्य केले नाही.
पाकिस्तानी जनतेचा भ्रम तुटला आहे. पाकिस्तान घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. त्यांच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानी जनतेला इतका भ्रमात ठेवले होते की, इंडियन आर्मीकडे काहीच नाही. त्यांची राफेलसारखी विमानेसुद्धा अजून आली नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे तिथले जनता भ्रमात होती. भारताच्या कारवाईनंतर खासदाराला संसदेत रडावे लागले. पाकिस्तानी आर्मीचे मनोबल सुद्धाखाली जायला सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर आपल्याला त्याचा फायदा होईल, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.
