‘भारत विश्वगुरू बनणार, समाज कायद्याने नव्हे तर संवेदनेने चालतो’, RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत यांचे विधान

RSS Chief Mohan Bhagwat: बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. त्यांनी भारत विश्वगुरू बनणार असल्याचे म्हटले आहे.

भारत विश्वगुरू बनणार, समाज कायद्याने नव्हे तर संवेदनेने चालतो, RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत यांचे विधान
mohan-bhagwat speech
| Updated on: Nov 08, 2025 | 6:05 PM

बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी संघाचे कौतुक करताना संघाचे वर्णन जगातील सर्वात अद्वितीय संघटना असे केले. संघ भारतासह अनेक देशांमध्ये सामाजिक सेवा कार्यात गुंतलेला आहे असंही भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत विश्व गुरू बनणार

RSS कडून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, जेव्हा भारत जगाला आपलेपणाचे तत्व शिकवेल तेव्हाच भारत विश्व गुरू बनेल. तसेच प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञानातील यांच्यातील समानतेवर बोलताना भागवत म्हणाले की, आपली परंपरा ज्याला ‘ब्रह्म’ किंवा ‘ईश्वर’ म्हणते, आज विज्ञान त्याला “यूनिवर्सल कॉन्शसनेस” असे म्हणतात. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, ‘समाज केवळ कायद्याने नियंत्रित होत नाही तर सामाजिक सहानुभूतीने चालतो. समाजात सतत आपलेपणाची भावना राखणे आवश्यक आहे. कारण आपलेपणाची ही भावना समाजाला एकत्र आणण्याचे काम करते.’

मोहन भागवत यांनी पुढे बोलताना म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या शाळेत ब्रिटिश अधिकाऱ्यांचे स्वागत वंदे मातरम म्हणून करण्यात सुरुवात केली होती. त्यावेळीही डॉ. हेडगेवार लोकांना ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असे म्हणण्यास प्रोत्साहित करत होते. या प्रयत्वातून त्यांचे भारतावरील प्रेम दिसून येते. हेडगेवार हे एक धार्मिक नेते आणि समाजसुधारक होते.

पुढे बोलताना राष्ट्रीय एकतेवर बोलताना भागवत म्हणाले की, “आज आपली जनता राजकीयदृष्ट्या एकजूट राहिलेली नाही. सामान्य लोकांनीही राजकीयदृष्ट्या जागरूक असले पाहिजे. राजकीय जागरूकतेमुळे सामान्य लोकांना ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असे म्हणण्याचे धाडस मिळाले आहे.

आरएसएस ही समाजाची संघटना

आपल्या भाषणात पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘संघ राष्ट्रीय घडामोडींमध्ये भाग घेतो, मात्र तो राजकीय पक्ष नाही. आरएसएस ही समाजाची संघटना आहे, समाजातील संघटना नाही. आपण संघ समजून घेतला पाहिजे. संघाचे अनेक हितचिंतक संघाला एका विशिष्ट परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून चित्रित करतात, परंतु तसे नाही. संघ कोणत्याही प्रतिक्रियेतून किंवा निषेधातून जन्माला आला नाही. संघ प्रत्येक समाजाची एक आवश्यक गरज पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात आला आहे. संघ म्हणजे हिंदू समाज. त्यामुळे हा समाज संघटित असला पाहिजे.’