AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train: रेल्वेने स्वस्तात करायचा प्रवास? मग हे नियम जाणून घ्या, रेल्वे भाडे होते कमी, कोणाला मिळते तिकीटात सवलत?

Indian Railway Basic Fare: रेल्वेने स्वस्तात प्रवास करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या पद्धतीने रेल्वे प्रवासात तुम्हाला सवलत मिळू शकते. कशी मिळवता येईल ही सवलत?

Train: रेल्वेने स्वस्तात करायचा प्रवास? मग हे नियम जाणून घ्या, रेल्वे भाडे होते कमी, कोणाला मिळते तिकीटात सवलत?
रेल्वेने स्वस्तात करायचा प्रवास? मग हे नियम जाणून घ्या
| Updated on: Jul 10, 2026 | 3:22 PM
Share

Indian Railway Basic Fare: भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दूरच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडला जातो. भारतीय रेल्वे प्रवासासाठी तिकिटाच्या भाड्यात विशेष सवलत देते. सध्याच्या नियमांनुसार, दिव्यांगांना श्रेणी 4 मध्ये, रुग्णांसाठी श्रेणी 11 मध्ये तर विद्यार्थ्यांना श्रेणी 8 मध्ये खास सवलत दिली जाते. पण या सवलतीचा लाभ घेण्यासाठी रेल्वेकडून आवश्यक पास काढणे आवश्यक आहे. ही सवलत प्रवाशांच्या मूल तिकीट भाड्यावर, किरायावर (Basic Fare) लागू होते. साधारणतः 300 किलोमीटर अथवा त्याहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी ही सवलत दिली जाते. परीक्षार्थी , विद्यार्थी अथवा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना ही 300 किलोमीटरच्या अंतराची अट लागू होत नाही.

कुणाला मिळणार ही सवलत?

रेल्वेने नियमात अनेक बदल केले आहेत. त्यानुसार ही सुविधा काही मर्यादीत श्रेणीतील प्रवाशांनाच लागू होते.

जे विद्यार्थी परीक्षेसाठी अथवा शिक्षणासाठी रेल्वे प्रवासाचा वापर करतात. शैक्षणिक सहल (Educational Tour) अथवा संशोधनासाठी (Research) प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वे भाड्यात सवलत मिळते.

कर्करोग, (Cancer), क्षयरोग (TB), मूत्रपिंड आजाराने ग्रस्त रुग्ण (Kidney Disease), संसर्गजन्य नसलेले कुष्ठरोगी (Non-infectious Leprosy) तसेच थॅलेसेमिया (Thalassemia) यासारख्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी प्रवास करणाऱ्या रुग्णांना सवलत दिली जाते.

दिव्यांग प्रवाशांमध्ये दृष्टीदोष (Blind/Visually Impaired), अस्थिदिव्यांग, जायबंदी, फिरणे कठीण असलेले रुग्ण (Orthopedically Disabled) प्रवाशांना सुद्धा सवलत लागू होते.

अट आणि नियम काय?

सवलतीत प्रवास करण्यासाठी अटी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे गंतव्य स्थानापर्यंत हा प्रवास करावा लागतो. समजा परीक्षेसाठी अथवा उपचारासाठी मुंबई गाठणे गरजेचे असेल तर या शहरापर्यंतचा प्रवास करणे आवश्यक आहे. प्रवाशांना मध्येच उतरता येणार नाही. दुसऱ्या स्टेशनवर थांबता येणार नाही.

ही सवलत सर्व रेल्वे गाड्यांसाठी लागू नाही. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस, गरीब रथ विशेष गाड्या, हमसफर एक्सप्रेसर वा इतर खास रेल्वेमध्ये ही सवलत लागू नाही. पण काही विशिष्ट श्रेणीतील प्रवाशांना ही सवलत मिळते.

प्रवासी विनातिकीट आढळल्यास, चुकीच्या तिकीटासह प्रवास करताना तो सापडल्यास सवलतीच्या तिकिटावर ठरलेल्या स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकाकडे प्रवास केल्यास त्याने एससी डब्यातून प्रवास केल्याचे समोर आल्यास विशेष सवलतीची लाभ मिळत नाही. त्याला दंड लावला जाऊ शकतो.

वैद्यकीय श्रेणीतील रुग्णांसाठी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आजाराविषयीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र रेल्वे आरक्षण काऊंटरवर सादर केल्यानंतर तिकिटाच्या भाड्यात थेट सवलत देण्यात येते.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु