AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाचा धुमाकूळ… ट्रेन 3 तासांपेक्षा उशीरा आल्यास मिळतो रिफंड? जाणून घ्या रेल्वेचा नियम

Train Delay Refund: रेल्वे प्रवासात अनेकदा इच्छित स्थळी वेळेत पोहचण्यासाठी आपण वेळेच्या आधी रेल्वे स्टेशनवर येतो आणि मग कळते की रेल्वे उशीरा धावत आहे. अशावेळी प्रवाशाला तिकिटाचे पैसे रिफंड मागता येतात का? काय आहे याविषयीचा नियम?

पावसाचा धुमाकूळ... ट्रेन 3 तासांपेक्षा उशीरा आल्यास मिळतो रिफंड? जाणून घ्या रेल्वेचा नियम
ट्रेन 3 तासांपेक्षा उशीरा आल्यास मिळतो रिफंड?
| Updated on: Jul 07, 2026 | 4:32 PM
Share

Indian Railway Delay Refund: प्रवास करताना अनेकदा रेल्वे उशीरा येते. प्रवाशांचे समोरचे वेळापत्रक पार कोलमडते. अशावेळी तिकीटाचे पैसै परत मिळतात का? तर त्यासाठी काही नियम आहेत. जर तुमची रेल्वे 3 तास अथवा त्यापेक्षा अधिक उशीरा आली आणि प्रवास न करण्याचा निर्णय तुम्ही घेतला तर काही अटी आणि शर्तींवर प्रवाशाला रिफंड मिळतो. नेहमी रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. प्रवासातील अडचण दूर होईल. नुकसानही टळेल.

पूर्ण पैसे केव्हा मिळतील परत?

जर तुमची रेल्वे निश्चित वेळच्या 3 तास अथवा त्यापेक्षा अधिक वेळाने उशीरा येत असल्यास तुमच्याकडे कन्फर्म, RAC वा वेटिंग तिकीट असल्यास रेल्वेचा प्रवास रद्द करता येतो. रेल्वे अशा परिस्थितीत तिकीटाचे संपूर्ण पैसे परत करते. पण त्यासाठी रेल्वे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन तिकीट घेतल्यास काय करावे?

प्रीमियम तात्काळ तिकीटाची बुकिंग एक दिवस अगोदरपासून सुरु होते. बुकिंगनंतर आसन हे तात्काळ सारखेच देण्यात येते. पण त्यात एक फरक आहे. तात्काळपेक्षा या तिकीटासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. या तिकीटाची बुकिंग केवळ IRCTC च्या App अथवा Portal वरुनच करता येते.

जर तुम्ही IRCTC च्या साईटवरून तिकीट बुक केले असेल तर ट्रेन धावण्यापूर्वी TDR भरणे आवश्यक आहे. जर TDR नाही भरला तर रिफंड मिळण्यात अडचण येऊ शकते. TDR भरल्यानंतर रेल्वे तात्काळ रिफिंडची प्रक्रिया पूर्ण करते. साधारपणे 3 ते 7 कार्यालयीन दिवसात प्रवाशांच्या बँक खात्यात तिकिटाची रक्कम जमा होते.

काऊंटरवरून तिकीट काढल्यास काय करावे?

जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटरवरून तिकीट खरेदी केले असेल तर प्रवाशाला स्वतः काऊंटरवर जाऊन तिकीट रद्द करावे लागते. केवळ ट्रेन उशीरा आली म्हणून तुमचे तिकीट रद्द होणार नाही. तिकीट कॅन्सल केले नाही तर रिफंड रक्कमही मिळत नाही. ठोस कारणाशिवाय तिकिटाचे पैसे परत मिळणार नाही.

या गोष्टीही महत्त्वाच्या

जर ट्रेन उशीरा आली आणि पुढे गेली तर पूर्ण पैसे परत मिळत नाहीत. रेल्वे काही पैसे कपात करून पैसे परत करते. तिकिटाचा प्रकार आणि तिकिट केव्हा परत केले यावर ते अवलंबून असते. अशावेळी ट्रेन उशीरा येण्याची शक्यता लक्षात घेत लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे