Indian Railway : ट्रेन सुटायच्या 5 मिनिटे आधी मिळते कन्फर्म तिकीट, कसे ते पाहा

तुम्ही ट्रेनने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जर तुम्हाला अचानक कुठे जायचे असेल तर कन्फर्म तिकीट नसते, मग यासाठी काय कराल तर वाचा सविस्तर

Indian Railway : ट्रेन सुटायच्या 5 मिनिटे आधी मिळते कन्फर्म तिकीट, कसे ते पाहा
| Updated on: Jun 01, 2025 | 8:24 PM

भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात सर्वात चौथे क्रमांकावर आहे. जर  तुम्हाला अचानक लांब पल्ल्याचा प्रवास करायची वेळ आली तर रेल्वेसारखा आरामदायी प्रवास नसतो. त्यामुळे सर्वजण लांबचा प्रवास करताना रेल्वेचाच वापर करीत असतात. परंतू तिकीट आरक्षण नसल्यास रेल्वे प्रवाशांना तात्काळ तिकीटाचा पर्याय असतो. मात्र तात्काळ मध्ये कन्फर्म तिकीट न मिळाल्यास काय करायचे ते पाहूयात…

अर्जंट प्रवासासाठी ट्रेन सुटण्याच्या अवघ्या पाच मिनिटे आधीही कन्फर्म तिकीट मिळत असते. ते कसे मिळवायचे हे आज आपण वाचणार आहोत. म्हणजे, तुमच्याकडे जनरल किंवा तात्काळ तिकीट नसले तरीही तुम्हाला प्रवास करता येणार आहे. कोणतीही अडचण येणार नाही. ट्रेन सुटण्याच्या काही मिनिटांपूर्वीही तुम्ही कन्फर्म तिकीट बुक करू शकता. रेल्वेच्या या सुविधेला ‘करंट तिकीट’ योजना म्हणतात.

 बुकिंग ट्रेनचा चार्ट बनल्यानंतर करंट तिकीट

IRCTC च्या वेबसाइटने दिलेल्या माहीतीनुसार , करंट तिकीट बुकिंग ट्रेनचा चार्ट बनल्यानंतर सुरु होते. सर्वसाधारणपणे बुकींग चार्ट ट्रेन सुटण्याच्या चार तास आधीच तयार केला जातो. वास्तविक, चार्ट तयार झाल्यानंतरही काही सिट रिकाम्या असतात. या सिट करंट बुकींग अंतर्गत बुक केल्या जातात. ट्रेन सुटण्याच्या काही मिनिटे आधी ही तिकीट ऑनलाईन बुक करता येतात.ही सुविधा IRCTC च्या वेबसाईट आणि मोबाईल एप दोन्हींवर उपलब्ध असते.

करंट तिकीट बुकिंग

तिकीट बुक करण्यासाठी IRCTC एप वा वेबसाईटवर जाऊन सर्व माहीती भरणे गरजेचे असते. तारखेत तोच दिवस निवडायचा असतो ज्या दिवशी ट्रेन रवाना होते. हे बुकींग चार्ट तयार झाल्यानंतरच करता येते. सर्वसाधारणपणे ४ तास आधीच करंट बुकींग स्टेटस पाहाता येते.त्यानंतर प्रवासी ट्रेन आणि श्रेणीची निवड करतो. तेव्हा सीट रिकामी असेल तर ‘CURR_AVBL’ असा संदेश येतो.याचा अर्थ त्या ठराविक ट्रेनमध्ये करंट तिकीट उपलब्ध आहे, तुम्ही लागलीच कन्फर्म तिकीट बुक करु शकता.

IRCTC च्या माहीतीनुसार, करंट बुकिंग केवल ई-तिकीटांच्या रुपातच करता येते. येथे केवळ कन्फर्म तिकीटच मिळतात. जर करंट बुकींग वेटिंग लिस्टची सुविधा दिली जात नाही. एकदा तिकीट बुक झाल्यानंतर त्यात नाव, वय, लिंग वा बोर्डिंग स्टेशन बदलता येत नाही.