AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway: आज रेल्वेने रद्द केल्या 169 गाड्या, यात तुमच्या गाडीचा समावेश तर नाही ना?

भारतीय रेल्वेने आज 169 रेल्वे रद्द केल्या आहेत. यामध्ये कोणकोणत्या गाड्यांचा समावेश आहे आणि ते कसे तपासायचे जाणून घेऊया

Indian Railway: आज रेल्वेने रद्द केल्या 169 गाड्या, यात तुमच्या गाडीचा समावेश तर नाही ना?
भारतीय रेल्वे Image Credit source: social media
| Updated on: Oct 25, 2022 | 11:43 AM
Share

नवी दिल्ली,  देशात दररोज लाखो लोक रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. अशा परिस्थितीत, प्रवासासाठी घर सोडण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुमची ट्रेन रद्द, वळवली किंवा पुन्हा शेड्यूल केलेली तर नाही ना? जर तुम्ही आज ट्रेनने प्रवास करणार असाल तर लक्षात घ्या की अनेक कारणांमुळे भारतीय रेल्वेने आज मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द (Cancelled train today)  केल्या आहेत.

वास्तविक त्याची माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून दररोज देण्यात येत असते. ही माहिती रेल्वेच्या अधिकृत या वेबसाइटवर पाहू शकते. ही माहिती  https://enquiry.indianrail.gov.in/mnte किंवा NTES ॲपवर देखील उपलब्ध आहे.

आज रद्द झालेल्या, वळवलेल्या किंवा बदललेल्या गाड्यांबद्दल मिळालेल्या माहितीनुसार  169 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 7 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. आज ३ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.  ही यादी रेल्वेकडून सतत अपडेट केली जाते. अशा स्थितीत गाड्यांची संख्या वाढवणे, वळवणे आणि वेळापत्रक बदलणे शक्य आहे. त्यामुळे या संदर्भातील अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे.

याप्रमाणे तपासा रद्द केलेल्या, वळवलेल्या आणि पुनर्निर्धारित गाड्यांची यादी

  • https://enquiry.indianrail.gov.in/mnte या वेबसाइटला भेट द्या.
  • स्क्रीनच्या वरच्या उजव्या पॅनलवर तीन ओळी दिसणार्‍या मेनू बटणावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला येथे Exceptional Trains लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता रद्द केलेल्या गाड्यांचा पर्याय उपलब्ध असेल, रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
  • गाड्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी, पूर्ण किंवा अंशतः पर्याय देखील आहे. लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या तारखेला
  • गाड्यांची यादी हवी आहे ती तारीख निवडणे आवश्यक आहे.
  • त्याच प्रक्रियेचा अवलंब करून, येथे तुम्ही पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांची यादी देखील पाहू शकता आणि तुम्हाला ज्या ट्रेनने प्रवास करायचा आहे ती रद्द, वळवलेली किंवा पुनर्निर्धारित केलेली आहे की नाही हे शोधू शकता.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....