रेल्वेतून आता बिनधास्त विनातिकीट प्रवास करा, प्रवाशांना मिळणार ही खास सोय…

| Updated on: Nov 03, 2022 | 5:24 PM

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार जर तुमचे रिझर्व्हेशन झाले नसेल आणि तुम्हाला ट्रेनने कुठेतरी जायचे असेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकणार आहात.

रेल्वेतून आता बिनधास्त विनातिकीट प्रवास करा, प्रवाशांना मिळणार ही खास सोय...
Follow us on

नवी दिल्लीः तुम्ही रेल्वेने जाण्याचा बेत करत असाल आणि तुम्हाला ऐनवेळी तिकीट मिळाले नाही तर आता त्या गोष्टीचं टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. किंवा जर तुम्हाला कधी अचानक प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्ही आता रिझर्व्हेशनशिवाय प्रवास करु शकणार आहात. यापूर्वी प्रवाशांना या परिस्थितीत केवळ तत्काळ तिकीट बुकिंग करण्याचाच पर्याय होता. मात्र त्यामध्येही तिकीट जर मिळाले नाही तर असा आता प्रश्नच राहणार नाही. या अशा परिस्थितीत रेल्वेने एक नवीन नियम आणला आहे. त्यामध्ये तुम्हाला आता या सुविधेअंतर्गतच आरक्षणाशिवाय तुम्ही प्रवास करू शकणार आहात.

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार जर तुमचे रिझर्व्हेशन झाले नसेल आणि तुम्हाला ट्रेनने कुठेतरी जायचे असेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकणार आहात.

त्यानंतर तुम्ही टीसीकडूनही तिकीट मिळवू शकणार आहात. हा नियम भारतीय रेल्वेकडून बनवण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच Travelling Ticket Examiner शी संपर्क साधावा लागणार आहे.

त्यानंतर TTE तु्म्हाला कुठपर्यंत जायचे त्या ठिकाणापर्यंत ते तुम्हाला तिकीट तयार करुन देणार आहेत. यावेळी तुम्ही टीटीईकडे कार्ड पेमेंटही करु शकता.

ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास, TTE तुम्हाला राखीव सीट देण्यास नकार देऊ शकतो. पण, प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल, तर अशा परिस्थितीतही प्रवाशाकडून 250 रुपये दंडासह, प्रवासाचे एकूण भाडे भरून तिकीट मिळू शकते.

तुमच्याकडे जर प्लॅटफॉर्म तिकीट असेल तर प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार मिळत असतो. त्यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागणार आहे. त्यामुळे तिकीटाचे भाडे आकारताना पहिल्या स्थानकापासून तुम्हाला भाडे द्यावे लागणार आहे.