मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, केली सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेला जागा दाखवली

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली असून, भारतानं अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, केली सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेला जागा दाखवली
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 5:51 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढतच आहे, त्यामुळे आता जगातील अनेक देशांमध्ये मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. जगाला जेवढी इंधनाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के इंधनाची वाहतूक ही एकट्या होर्मुज सामुद्रधुनीमधून होते, मात्र आता ही सामुद्रधुनी काही देशांसाठी इराणने बंद केली आहे. तर काही देशांना जरी या मार्गाने तेल वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आलेली असली तरी देखील मिसाईल हल्ल्यांच्या भीतीमुळे अनेक देशांनी या मार्गाने तेल वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका हा भारताला देखील बसल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान भारतामध्ये इंधन टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी भारताने आता रशियाकडून तेल खरेदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच एक बातमी समोर आली होती, ती म्हणजे अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी एक महिन्याची सूट दिली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर आपली बाजू स्पष्ट करताना भारतानं अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं आहे. भारत सरकारने आपली बाजू स्पष्ट करताना म्हटलं आहे की, आम्हाला तेल खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. राष्ट्र हीत जिथे असेल तिथून आणि केव्हाही आम्ही कच्च्या तेलाची खरेदी करू शकतो. सध्या होर्मुज सामुद्रधुनीमध्ये युद्धामुळे तणाव आहे, अशा परिस्थितीमध्ये जो देश भारताला सर्वात स्वस्त कच्च्या तेलाची ऑफर देईल त्याच्याकडून आम्ही तेलाची खरेदी करू.

अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी एक महिन्याची सूट दिली आहे, यावर भारतानं अमेरिकेला चांगलंच ठणकावलं आहे, आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही, जर आम्हाला स्वस्त कच्च तेल मिळत असेल तर आम्ही त्यानंतरही रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवणार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. दरम्यान पूर्वी भारत 27 देशांकडून तेलाची खरेदी करत होता, आता भारतानं विकेंद्रीकर केलं आहे, भारत आता 40 देशांकडून तेलाची खरेदी करत आहे. त्यामुळे देशात इंधन टंचाई जाणवणार नाही, असंही यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Follow Us