AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेमुळे भारताचं तब्बल 4,70,55,47,50,00,000 रुपयांचं नुकसान, अमेरिका भरपाई देणार?

अमेरिकेमुळे भारताचं तब्बल 500 अब्ज डॉलर म्हणजेच 4,70,55,47,50,00,000 एवढ्या रुपयांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे ब्राझीलला देखील 330 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे.

अमेरिकेमुळे भारताचं तब्बल 4,70,55,47,50,00,000 रुपयांचं नुकसान, अमेरिका भरपाई देणार?
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 7:28 PM
Share

हवामान बदल हा जगाच्या अर्थव्यवस्थेला वाळवीप्रमाणे पोखरून काढत आहे. या संदर्भात नुकताच ‘नेचर’ जर्नरमध्ये एक अहवाल छापण्यात आला आहे. या अहवालानुसार 1990 पासून ते आतापर्यंत अमेरिकेतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाने जागतिक अर्थव्यवस्थेचं तब्बल 10 ट्रिलियन डॉल ( 9,40,335 कोटी रुपयांचं) नुकसान केलं आहे. हा आकडा एवढा मोठा आहे की, जगात असे अनेक देश आहेत, त्यांची तर एवढी अर्थव्यवस्था देखील नाहीये. अमेरिका हा कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीमध्ये जगातील नंबर एकचा देश आहे. परंतु अमेरिकेच्या या कार्बन उत्सर्जनाची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागत आहे. स्वत: अमेरिकेला देखील या कार्बन उत्सर्जनाचा मोठा फटका बसल्याचं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र ज्या देशांचं प्रदूष खूप कमी आहे, अशा देशांना अमेरिकेच्या कार्बन उत्सर्जनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं हा रिपोर्ट सांगतो.

भारत आणि ब्राझीलचं सर्वाधिक नुकसान

या रिसर्चमधून काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार अमेरिकेमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा सर्वाधिक फटका हा भारत आणि ब्राझिलला बसला आहे. या कार्बन उत्सर्जनामुळे भारताचं तब्बल 500 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. 500 अब्ज डॉलर म्हणजेच (4,70,55,47,50,00,000) एवढ्या रुपयांचं भारताचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे ब्राझीलला देखील तब्बल 330 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्रज्ञ मार्शल बर्क यांच्या नेतृत्वात हे सिसर्च करण्यात आलं आहे. हे नुकसान एकदम झालेलं नाहीये, तर हळुहळु हे नुकसान झालं आहे, हा अर्थव्यवस्थेला फार मोठा फटका आहे, याबाबत उदाहारण द्यायचं झालं तर लवकर लक्षात न येणाऱ्या छोट्या-छोट्या घावांमुळे एखाद्याचा मृत्यू होणं अशी ही घटना असल्याचं मार्शल बर्क यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक प्रदूषण या दोन देशांमुळे

या रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषण हे अमेरिका आणि चीन या दोन देशांमुळे होत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये स्पर्धा लागली असावी की कोण सर्वाधिक प्रदूषण करतं? अशी ही स्थिती असल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं आहे. 1990 पासून हीच स्थिती आहे. सुरुवातीला अमेरिका मात्र आता चीनचा देखील प्रदूषणात झपाट्यानं सहभाग वाढत असल्याचं ही बदलेली आकडेवारी सांगत आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?