IndiGo Crisis : इंडिगोचे संकट का निर्माण झाले, विमानतळे झाली एसटी स्थानके, वाचा पूर्ण कहानी…

इंडिगो एअरलाईन्स सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अनेक विमाने रद्द आणि उशीराने टेक ऑफ घेत असल्याने प्रवाशांचा संताप अनावर होत आहे. विमानाचे तिकीटाचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसा इंडिगोने २००० हून अधिक उड्डाण सेवा रद्द केल्या आहेत. या काय आहे हे संकट ? कशामुळे निर्माण झाले ?

IndiGo Crisis : इंडिगोचे संकट का निर्माण झाले, विमानतळे झाली एसटी स्थानके, वाचा पूर्ण कहानी...
IndiGo Crisis
| Updated on: Dec 09, 2025 | 7:01 AM

देशाची सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी विमान वाहतूक कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडल्याने प्रवासी हवालदिल झाली आहे. गेल्या आठवडाभरात दोन ते तीन हजार विमान उड्डाणे रद्द झाल्याने संपूर्ण देशातील एअरपोर्टची अवस्था एसटी स्थानकासारखी झाली आहे. परंतू अखेर असे संकट का आले की देशाची सर्वात मजबूत एअरलाईनची सिस्टीम अचानक ठप्प का झाली ? का हजारो प्रवाशांना एअरपोर्टवर अडकून पडावे लागले ? कसे काय एका पाठोपाठ इतकी स्थिती ओढवली ? चला विस्ताराने वाचूया…संपूर्ण कहाणी… कसे वाढले इंडिगोचे संकट? गेल्या काही दिवसांपासून इंडिगोने फ्लाईट लेट झाल्याने आणि छोट्या तांत्रिक बिघाडाशी लढत आहे. एअरलाईन याला कधी हवामान, तर कधी एअरपोर्टवरील गर्दीला जबाबदार मानले जात होते. परंतू खरे कारण नंतर पुढे आले. सरकारने फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशन(FDTL)चे नवे नियम लागू केल्यानंतर हा गोंधळ उडाला. या नियमांमागे पायलटना थकव्यापासून वाचवणे हा हेतू होता. परंतू आधी कर्मचाऱ्यांची कमतरता असलेल्या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा