
चेन्नईच्या विमानतळावर एक मोठा अपघात पायलट आणि इतर यंत्रणाच्या समन्वयामुळे थोडक्यात टळला आणि ७६ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. शनिवारी सकाळी एका इंडिगो कंपनीच्या विमानाच्या विंडशील्डमध्ये काचेला तडे गेल्याचे निदर्शनास आले. एअरपोर्ट अथॉरिटीने तातडीने प्रसंगावधान दाखवत पायलटच्या मदतीने या विमानाला तातडीने रनवेवर सुरक्षित उतरवले. घटनेच्या वेळी हे विमान मदुरईवरून चेन्नईला परतत होते.
मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या कॉकपिटच्या ग्लासमध्ये तडे गेल्याचे लँडींगच्या आधी पायलटच्या निदर्शनास आले. त्यानंतर पायलटने याची माहीती लागलीच एअरपोर्टवरील एअर ट्रॅफीक कंट्रोलरला दिली. पायलटच्या सूचनेनंतर एअरपोर्टवर विमानाला सुरक्षित उतरवण्याची तयारी सुरु करण्यात आली. विमानाला धावपट्टीवर सुरक्षित उतरवल्यानंतर सर्वांची जीव भांड्यात पडला.
शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री इंडिगोचे विमान ७६ प्रवाशांसह मदुरईहून चेन्नईला जात होते. या दरम्यान चेन्नई विमानतळावर लँडींग होण्याच्या आधी पायलटची नजर विमानाच्या विंडशील्डवर गेली. त्यावेळी काचेला तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पायलट सावधान झाले. त्यांनी लागलीच सावधानता बाळगत विमानतळाच्या एअर ट्रॅफीक कंट्रोलरला हे सांगितले.त्यानंतर विमानाच्या सुरक्षित लँडींगसाठीची तयारी विमानतळावर करण्यात आली. त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर विमानातून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
एअरपोर्टवर सुरक्षित लँडींग केल्यानंतर विमानाची विंडशील्ड बदलण्याची व्यवस्था केली गेली. परंतू विंडशील्ड तडे नेमके कशामुळे गेले हे कळलेले नाही. दुसरीकडे हे मदुरईसाठी परतीचे विमान रद्द करण्यात आले. या घटनेच्या खूप वेळानंतर इंडिगो एअरलाईनच्या वतीने त्यांची प्रतिक्रीया समोर आली. आम्ही एसओपीचे पालन करीत विमानाला चेन्नईच्या विमानतळावर सुरक्षित लँडींग केले.आणि आवश्यक तपासणी आणि मंजूरीनंतर या विमानाद्वारे अन्य उड्डाणे केली जातील असे इंडिगो एअरलाईन्स म्हटले आहे.
शनिवारी पुणे ते दिल्ली जाणाऱ्या अकासा एअरलाईन कंपनीच्या विमानाला एका पक्षाची टक्कर झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर विमानाला सुरक्षितपणे लँड करण्यात आले. सर्व प्रवाशांना आणि चालक दल सदस्यांना सुखरुप उतरवण्यात आले. घटनेवर बोलताना अकासा एअर प्रवक्त्याने सांगितले की इंजिनिअरिंग टीमने अकासा एअरच्या मानक संचालन प्रक्रियेनुसार विमानाची तपासणी केली आहे.