एअर इंडियाच्या विमानात आक्रीत घडले,अचानक कॉकपिटचा दरवाजा उघडू लागला प्रवासी, मग काय झाले
बंगळुरु ते वाराणसी जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये थरार घडला आहे. जेव्हा एक प्रवासी उड्डाणादरम्यान अचानक कॉकपिटचा दरवाजा उघडू लागला...नंतर काय झाले वाचा

विमानातील प्रवासी कधी काय करतील याचा नेम नाही. विमान प्रवाशांच्या करामतीमुळे अनेकदा विमानात प्रवासी गडबड करत असतात. असाच काहीसा प्रकार बंगळुरु ते वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात घडला आहे. एका विमान प्रवाशाने अचानक कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. महत्वाचे म्हणजे त्याने दरवाजाचा पासकोडही बरोबर टाकला होता. परंतू कॅप्टनने विमान हायजॅक होण्याच्या भितीने दरवाजाच उघडला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हा प्रवासी आपल्या आठ साथीदारासोबत प्रवास करत होता. चला तर पाहूयात काय नेमके घडले.
बंगळुरु ते वाराणसी येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र घटना घडली आहे. विमानात एका प्रवाशाने अचानक पायलटच्या कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमानात घबराट उडाली. या प्रवाशाने पासवर्ड देखील योग्य टाकला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यानंतर कॅप्टनने प्रसंगावधान राखत विमानाच्या कॉकपिटचा दरवाजा आतून उघडू दिला नाही. या विमान प्रवाशा सोबत अन्य आठ प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर या प्रवाशासह त्याच्या सर्व साथीदारांना सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट IX-1086 मध्ये सोमवारी सकाळी 8 वाजता ही खळबळ जनक घडना घडली आहे.
एयर इंडियाचे म्हणणे काय ?
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्हाला वाराणसी जाणाऱ्या आमच्या एका विमानासंदर्भात बातमी मीडियातील बातमीनुसार मिळाली आहे. येथे एक प्रवासी शौचालय शोधताना कॉकपिटच्या प्रवेश क्षेत्रात पोहचला. आम्ही यास दुजारो देत आहोत की सुरक्षेची सर्व पावले उचलण्यात आली आणि त्यात कोणतीही हलगर्जी झालेली नाही. लँडींगच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहीती देण्यात आली आहे. आणि सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणा दरम्यान घडलेल्या घडामोडीबद्दल सांगितले की, आम्ही सुरक्षा प्रोटोकॉलचे योग्य पालन केले आहे. लँडिंगच्या वेळी संबंधितांना सूचना दिली होती आणि आता त्याची तपासणी सुरू आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, प्रवाशाला आता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि त्याच्या विमानातील या कृत्यासाठी त्याला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते.
