AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये होणार जलसंकट, सिंधू नदीवरील 4 योजनांचा कामांना वेग, वुलर बॅरेजही बनवणार

Indus Water Treaty: काश्मीरमधील ज्या योजनांवर वेगाने काम सुरु आहे, त्यात १००० मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरु प्रकल्प, ५४० मेगावॅटचा क्वार आणि ८५० मेगा वॅटचा रतले प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व योजना चिनाब नदीवर आहेत.

पाकिस्तानमध्ये होणार जलसंकट, सिंधू नदीवरील 4 योजनांचा कामांना वेग, वुलर बॅरेजही बनवणार
indus projects
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 18, 2025 | 9:00 AM
Share

Indus Water Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी थांबवले जात आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरमधील चार जलविद्युत योजनांवर वेगाने काम सुरु आहे. तसेच अन्य दोन योजनांचा आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १९६० पासून कार्यरत असलेला सिंधू जलकरार भारताने स्थगित केला होता.

चार योजनांच्या कामांना वेग

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या योजनांवर वेगाने काम सुरु आहे, त्यात १००० मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरु प्रकल्प, ५४० मेगावॅटचा क्वार आणि ८५० मेगा वॅटचा रतले प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व योजना चिनाब नदीवर आहेत. या सर्व योजनांच्या कामांना वेग घेतला असून पूर्ण करण्याची डेडलाइन कमी करण्यात आली आहे. या योजना आता मे २०२६ ते जुलै २०२८ दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.

रतले प्रकल्प २०२६ मध्ये पूर्ण?

रतले जलविद्युत प्रकल्प मे २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. रतले जलविद्युत पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही कंपनी राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ (JKSPDC) यांच्या संयुक्त उपक्रम म्हणून कार्यरत आहे.

वुलर बॅरेजचे काम सुरु होणार

ऊर्जा मंत्रालयाने वुलर बॅरेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे मूल्यांकन देखील सुरू केले आहे. यापूर्वी ही योजना पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपांमुळे १९८७ मध्ये स्थगित केली होती. परंतु २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १९६० चा पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताने या प्रकल्पांशी संबंधित माहिती शेअर करणे थांबवले आहे. यामुळे वुलर बॅरेजला चालना मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार आहे. सन २०२६ मध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...