AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel – Hamas युद्धामुळे भारतासह संपूर्ण जग धोक्यात! गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर

Israel - hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध हे केवळ दोन देशांमधील युद्ध नाही. याचा परिणाम काय होऊ शकतो हे जगभरातील गुप्तचर संस्थांना माहित आहे. म्हणूनच ते हाय अलर्टवर आहेत. या संघर्षामुळे जगभरातील गुप्तचर यंत्रणांची चिंता वाढली आहे. जग धोक्यात आलं आहे.

Israel - Hamas युद्धामुळे भारतासह संपूर्ण जग धोक्यात! गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 18, 2023 | 9:55 PM
Share

Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा  परिणाम जगातील इतर देशांवर देखील होऊ शकतो. हा केवळ दोन देशांमधील संघर्ष नसून जगाभरातील देशांसाठी गंभीर इशारा आहे. इस्रायल आणि अरब देशांमधील वादामुळेच आज ही परिस्थिती ओढावली आहे. इस्रायल-हमास संघर्षाचा परिणाम जगावर होण्याची भीती आहे.

पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता पाठिंबा हे याचं सर्वात मोठं कारण आहे. इस्रायलवर हमासचा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला होता हे अनेक देश मान्य करायला तयार नाही. हे युद्ध  अमेरिका, अरब आणि इतर सर्व देशांसाठी मोठे आव्हान बनले आहे. दहशतवादी संघटनांची वाढती ताकद ही धोक्याची घंटा आहे. जग दोन गटात वाटलं गेलं आहे.  एक हमासला पाठिंबा देत आहेत आणि दुसरीकडे ते या युद्धाचा उपयोग आपली ताकद वाढवण्यासाठी करत आहेत.

भारतासाठी देखील ही धोक्याची घंटा आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. ज्यामुळे तणाव वाढू शकतो. दहशतवादी संधी साधण्याच्या तयारीत आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे अशी चुकीची माहिती आणि अपप्रचारापासून सावध राहण्याची गरज आहे.

अल कायदा, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात देखील अशा हल्ल्याची योजना आखू शकतात. त्यामुळे भारताला ही सतर्क राहण्याची गरज आहे. असे तज्ज्ञांचं मत आहे. इस्रायल-हमास युद्धाबाबत भारताने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे अनेक देश इस्रायलच्या विरोधात भूमिका घेत आहेत. इस्रायल-पॅलेस्टीन संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हमास हे माध्यम असू शकत नाही. कारण ती एक दहशतवादी संघटना आहे. हमासने नागरिकांची हत्या केली. अनेक नागरिकांना ओलीस ठेवले आहे. ते माणवतेचे शत्रू आहेत हे जगातील अनेक देश आपल्या स्वार्थापोटी विसरुन गेले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?