कुलभूषण जाधव प्रकरण : हरिश साळवेंनी त्यांचं काम केलं, आता मोदींचं काम सुरु

न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे.

कुलभूषण जाधव प्रकरण : हरिश साळवेंनी त्यांचं काम केलं, आता मोदींचं काम सुरु

हेग, नेदरलँड : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे. या निकालानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

या प्रकरणात भारताचा सर्वात मोठा विजय म्हणजे आता कौन्सिलर एक्सेस मिळणार आहे. म्हणजेच हा खटला पुन्हा चालवला जाईल आणि भारतालाही खटला लढवण्याचे अधिकार मिळतील. पण आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करायचा की नाही हा निर्णय पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य न केल्यास जगभरात पाकिस्तान स्वतःहून घेरलं जाईल. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आता पुढच्या काळात उपयोगी येणार आहेत.

आता मोदींचं काम सुरु

भारतात यापूर्वीही आणि यावेळीही स्थिर सरकार आल्यामुळे योग्य वकिलाची नेमणूक करुन खटला चालवण्यात कोणताही अडथळा आला नाही. हरिश साळवे यांनी प्रभावीपणे बाजू मांडून भारताला कौन्सिलर एक्सेस मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केलाय. पण पाकिस्तान या निर्णयावर काय भूमिका घेतं ते महत्त्वाचं आहे. पाकिस्तानने या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास भारताला आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दबाव वाढवता येईल.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहता कोणताही धोका पत्करणं किंवा जगाच्या विरोधात जाणं परवडणारं नाही. पाकिस्तानने निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास भारताकडे यूएनएससी म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. या परिषदेत आयसीजेच्या निर्णयाचा सन्मान करत पाकिस्तानवर दबाव वाढवला जाऊ शकतो. यूएनएससीमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्सचा समावेश आहे. या परिषदेतील पाचही देशांसोबत भारताचे सध्याचे संबंध अत्यंत चांगले आहेत. याचा फायदा या खटल्यात होईल आणि निष्पक्ष पद्धतीने पुन्हा एकदा खटला चालवता येईल.

फाशीला स्थगिती

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती.

Published On - 7:26 pm, Wed, 17 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI