AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री रस्त्यावर एकटीच उभी, 3 तासांत 40 पुरुषांनी घेरलं; IPS बी. सुमती यांचं सिक्रेट ऑपरेशन

रात्री साडेबारा वाजता निर्मनुष्य बस स्टॉपवर एक महिला एकटीच उभी होती. काहींनी तिच्याशी बोलण्याचा तर काहींनी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती की साध्या कपड्यांमध्ये उभी असलेली ती महिला पोलीस आयुक्त होती.

मध्यरात्री रस्त्यावर एकटीच उभी, 3 तासांत 40 पुरुषांनी घेरलं; IPS बी. सुमती यांचं सिक्रेट ऑपरेशन
IPS बी. सुमती यांचं सिक्रेट ऑपरेशनImage Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2026 | 2:29 PM
Share

मध्यरात्र झाली होती, हैदराबादमधील रस्ते शांत झाले होते, रात्री साडेबारा वाजताच्या सुमारासा दिलसुखनगर बस स्टॉप जवळपास निर्मनुष्य होता. अशा वेळी बस स्टॉपजवळ एक महिला उभी राहिली. तिने साधा सलवार सूट परिधान केला होता. तिच्या हातात मोबाइल फोन होता. ती रात्री उशिराच्या बसची वाट पाहत असावील, असंच एखाद्याला वाटेल. पण त्या रात्री हैदराबादच्या रस्त्यावर जे घडलं, ते एखाद्या चित्रपटातील रहस्यमयी दृश्यापेक्षा कमी नव्हतं. बस स्टॉपवर वाट पाहणाऱ्या त्या महिलेभोवती हळूहळू लोक जमू लागले होते. काही जण दूर उभं राहून तिच्याकडे एकटक पाहत होते. काहींनी तिच्याशी बोलण्याचा आणि तिच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला. तेव्हाच बस स्टॉपजवळच्या अंधारात लपलेली एक टीम अचानक समोर आली.

काही लोकांना जागीच थांबवलं गेलं, इतरांना चौकशीसाठी बाजूला नेलं. कारण ती काही सर्वसामान्य महिला नव्हती. त्या होत्या मलकाजगिरीच्या नवीन पोलीस आयुक्त आयपीएस बी. सुमती. 1 मे रोजी त्यांनी मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारताच त्यांनी महिलांच्या सुरक्षेबद्दलचं सत्य तपासण्यासाठी आपल्या एअर कंडिशन्ड ऑफिसमधून बाहेर पडायचं ठरवलं. जिथून दररोज रात्री हजारो महिला प्रवास करतात, अशा रस्त्यावर त्या उतरल्या. रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित आहेत, हे तपासण्यासाठी त्यांनी गुप्त मोहीम आखली.

रात्री सुमारे साडेबारा वाजता बी. सुमती या सर्वसामान्य महिलेप्रमाणे वेशांतर करून दिलसुखनगर बस स्टॉपवर उभ्या राहिल्या. त्यांच्या जवळच पण कोणाला कळून येणार नाही अशा पद्धतीने साध्या वेशातील पोलीस तैनात होते. तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही कल्पना नव्हती की आपण पाहत असलेली महिला ही शहराची पोलीस आयुक्त आहे. सुमती बस स्टॉपवर एकट्याच उभ्या होत्या. काही मिनिटांनंतर लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जाऊ लागलं. एका तरुणाने त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. दुसरा काही वेळ त्यांच्याकडे एकटर पाहत राहिला. काही लोक त्यांच्याभोवती घुटमळू लागले. अशा प्रकारे तीन तासांत जवळपास 40 लोक त्यांच्याजवळ आले होते. यापैकी काही तरुण नशेत असल्याचंही समजलं. काहींनी गांजा ओढल्याचाही संशय होता.

ज्या क्षणी तरुणांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्याचक्षणी जवळच साध्या वेशात उभ्या असलेल्या पोलिसांनी कारवाई केली. काहींना ताब्यात घेण्यात आलं आणि इतरांचं घटनास्थळीच समुपदेशन करण्यात आलं. रात्री उशिरा एकट्या असताना महिलांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्या किती असुरक्षित आहेत हे समजून घेणं हा या मोहिमेचा उद्देश होता.

बी. सुमती या तेलंगणा पोलिसातील सर्वात कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. मलकाजगिरी पोलीस आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी विशेष गुप्तचर शाखेचं नेतृत्व केलं होतं. माओवादी कारवायांशी संबंधित अनेक संवेदनशील प्रकरणं हाताळणं ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत उल्लेखनीय कामगिरी आहे.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ