AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या पाकवरील हल्ल्यामुळे भारताचा जुना हिशोब चुकता, कुलभूषण जाधव यांच्याशी आहे कनेक्शन

Iran attack in Pakistan | इराणने पाकिस्तानात घुसून हल्ला केलाय. इराणने जैश अल अदलवर थेट एअर स्ट्राइक केला. त्यामुळे जुना हिशोब चुकता झाला आहे. सध्या पाकिस्तानी तुरुंगात भारताचे नागरीक कुलभूषण जाधव बंद आहेत, त्यांच्याशी सुद्धा जैश अल अदलच कनेक्शन आहे.

इराणच्या पाकवरील हल्ल्यामुळे भारताचा जुना हिशोब चुकता, कुलभूषण जाधव यांच्याशी आहे कनेक्शन
Kulbhushan jadhav
| Updated on: Jan 17, 2024 | 12:35 PM
Share

Iran attack in Pakistan | इराणने मंगळवारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल-अदलवर एअर स्ट्राइक केला. जैश अल अदलच्या इराण सीमेवर दहशतवादी कारवाया सुरु होत्या. त्यांना पाकिस्तानची फूस होती. इराणने जैश अल-अदलवर कारवाई केली, एअर स्ट्राइक केला म्हणून पाकिस्तान खवळला आहे, पण या हल्ल्यामुळे भारताचा एक जुना हिशोब चुकता झाला आहे. जैश अल अदलनेच माजी नौदल अधिकारी आणि भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं होतं. जैश अल अदलच्या दहशतवाद्यांनी इराणमधून कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांनी कुलभूषण यांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI कडे सोपवलं.

जैश अल अदलने कुलभूषण जाधव यांना इराणच्या चाबहारमधून किडनॅप केलं होतं. त्यानंतर त्यांना पाकिस्तानात नेण्यात आलं. तिथेच कुलभूषण यांना हेरगिरीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं. पाकिस्तानी एजन्सीने कुलभूषण जाधव यांना अडकवलं होतं. तिथल्या कोर्टाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. कुलभूषण जाधव अजूनही पाकिस्तानी तुरुंगात बंद आहेत. त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टात या संबंधीचा खटला लढला गेला. तिथे पाकिस्तानची चांगलीच वाट लागली.

भारताचे परराष्ट्र मंत्री भेटले, त्यानंतर दोन दिवसात…

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दोन दिवसांपूर्वी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर अवघ्या 48 तासात इराणने पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश अल अदलवर मिसाइल आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यामुळे भारताचा जुना हिशोब चुकता झाला आहे. कुलभूषण जाधव यांचं अपहरण करणाऱ्या पाकिस्तान आणि जैश अल अदलला मिळालेली ही शिक्षा म्हणून त्याकडे पाहिल जातय.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.