मोठी बातमी! अखेर अमेरिका इराण युद्ध थांबणार, इराणने उचललं मोठं पाऊल, थेट…

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अमेरिका आणि इराणचं युद्ध थांबवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल पडलं आहे. त्यामुळे आता लवकरच अमेरिका आणि इराणमधील संघर्ष कमी होऊन, स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! अखेर अमेरिका इराण युद्ध थांबणार, इराणने उचललं मोठं पाऊल, थेट...
US-Iran Conflict
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 8:38 PM

अमेरिका आणि इरामध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरु होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थीने 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र तरी देखील इराण आणि अमेरिका यांच्यामधील संघर्ष अजूनही काही संपलेला दिसत नाहीये. याचा फटका संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. जगात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. यामधून भारत देखील सुटू शकलेला नाहीये. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. त्यानंतर अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. जरी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांकडून स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यात आहे.

आता युद्ध थांबवावं यासाठी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेकडून इराणला एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेनं इराणला 48 तासांचा वेळ दिला होता, अखेर आता इराणने अमेरिकेच्या या प्रस्तावावर आपलं उत्तर पाठवलं आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून हा प्रस्ताव अमेरिकेला पाठवला आहे. यामुळे आता हे युद्ध संपवण्याच्या दिशेनं इराणचं मोठं पाऊल मानलं जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धबंदी संदर्भात एक प्रस्ताव पाठवला होता, हा प्रस्ताव पाठवल्यानंतर मला अशा आहे की, इराण या प्रस्तावाचं लवकरात लवकर उत्तर देईल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी 14 सूत्रांचा एक प्रस्ताव युद्धबंदी संदर्भात इराणकडे पाठवला होता. मात्र इराणने यावर उत्तर देताना आम्ही आधी या प्रस्तावाचा अभ्यास करू असं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर आता इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला प्रस्ताव पाठवला आहे, त्यामुळे आता लवकरच युद्धाचा शेवट होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर हे युद्ध संपलं तर पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी ओपन होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us