IRCTC ची मडगांव येथून अष्ट ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रा,पाहा काय आहे पॅकेज

आयआरसीटीसीने ऑल इन्कलुसिव्ह पॅकेज अतिशय चांगल्यारितीने डिझाइन केले असून त्यामध्ये कन्फर्म रेल्वे तिकिटासह राहण्याची सोय, राहण्याची सोय, पर्यटनाच्या ठिकाणी बसेस ने फिरण्याची सोय, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, टूर गाईड, प्रवास विमा असे सगळे समाविष्ट केले आहे.

IRCTC ची मडगांव येथून अष्ट ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रा,पाहा काय आहे पॅकेज
IRCTC announces special train tour to Ashta Jyotirlingas
| Updated on: Jul 17, 2025 | 9:38 PM

भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या मडगांव येथून अष्ट ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रेचे आयोजन केलेले आहे. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.या ट्रेनमधून भक्तांना आणि पर्यटकांना कमी खर्चात सुरक्षित प्रवास करता येणार असून भारत गौरव ट्रेनद्वारे ही यात्रा होणार आहे.

भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये मिक्स स्लीपर ( नॉन एसी ) , एसी थ्री टीयर आणि एसी टु टीयर डब्बे असून एका ट्रेनमध्ये ६०० ते ७०० प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. या ट्रेनना सीसीटीव्ही, इन्फोमेन्ट सिस्टीम, आणि जेवणासाठी ऑनबोर्ड पॅण्ट्रीची व्यवस्था असणार आहे. या ट्रेनला भारतीय हेरिटेज दर्जाच्या कलाकृतीने सजवण्यात आलेले आहे.

या ट्रेनचे सर्वसमावेश पॅकेज प्रति व्यक्ती २३,८८० पासून सुरु होत असून बुकींग आयआरसीटीसीच्या वेबसाईट www.irctctourism.com वरुन करता येणार आहे.या सर्व समावेश पॅकेजमध्ये ट्रेनचा प्रवास, हॉटेस स्टे, जेवण, साईट पाहण्यासाठी रस्ता वाहतूकीचा खर्च,टुर गाईड, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि इतर ऑनबोर्ड सोयीसुविधांचा अंतर्भाव केलेला आहे.

या टुरमध्ये ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. त्यात द्वारका ( नागेश्वर ) ,सोमनाथ , उज्जैन( महाकालेश्वर ),ओमकारेश्वर, नाशिक ( त्र्येंबकेश्वर ), छत्रपती संभाजीनगर ( ग्रीष्णेश्वर), परभणी ( परळी वैजनाथ ) आणि मरकापूर ( श्रीसैलम मल्लिकार्जून ) या धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. या ट्रेनला बोर्डींग पॉईंट सोलापूर,कुर्डूवाडी, दौंड,पुणे,लोणावळा,कर्जत, कल्याण,वसई रोड, डहाणू रोड, वापी आणि सुरत अशी आहेत.

आयआरसीटीसीच्या या पॅकेजेस, त्यांचा तपशील, किंमत आणि बुकिंग प्रक्रियांबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहकांनी अधिकृत आयआरसीटीसी वेबसाईट www.irctctourism.com ला भेट द्यावी किंवा पश्चिम विभाग मुंबई कार्यालय 8287931886 (व्हॉट्सएप किंवा एसएमएस ) वर,कोंकण केरला टूर न 93097 73341 संपर्क साधू शकतात.