
मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्याने लहान मुले दगावल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने कफ सिरपवर बंदी घातली. महाराष्ट्रातील नागपूरमध्येही सहा मुलांचा मृत्यू कप सिरपमुळे झाल्याचे म्हटले जात होते. पण आता डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. सत्य काय आहे चला जाणून घेऊया…
कफ सिरपच्या मृत्यूचे लोण महाराष्ट्रापर्यंत?
नागपूरचे वैदयकीय अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांनी कप सिरपविषयी बोलताना, ’15 सप्टेंबर पासून आम्हाला अलर्ट आला होता आणि जीएमसीने आम्हाला सांगितले होते की त्यांच्याकडे काही ऍक्युट इंफ्लाईटीस सिंड्रोमचे पेशंट आलेले आहेत त्यामध्ये एक टिपिकल प्रेझेंटेशन आलं होतं की पेशंटला कम्प्लीट लघवी होत नाही त्यावर जीएमसी आमची टीम यांनी त्यावर अभ्यास केला. तर त्यामध्ये दिसून आलं की जे रुग्ण आहे ते सगळे मध्य प्रदेश मधून आलेले आहेत आणि एकाच भागातील असून त्यांनी कप सिरप सारखं काही औषध घेतला आहे’ असे म्हटले.
वाचा: रस्त्यावर जेवण, पांढरे कपडे; सुपरस्टार रजनीकांत यांनी सुरु केली आध्यात्मिक यात्रा
13 मृत्यू हे मध्य प्रदेशातील आहे 6 मृत्यू महाराष्ट्रातील
पुढे ते म्हणाले की, आतापर्यंत आमच्याकडे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये 13 मृत्यू हे मध्य प्रदेशातील आहे 6 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. मात्र, महाराष्ट्रातील ज्या सहा केसेस आहेत त्यांच्यामध्ये कुठेही कफ सिरपचा प्रकार दिसून आला नाही… मात्र मध्य प्रदेशातील ज्या केसेस आहेत त्यामध्ये कप सीरपचा प्रादुर्भाव असल्याचा प्राथमिक अंदाज पुढे येत आहे. आमच्या आणि जीएमसीच्या टीमने काही इन्व्हेस्तिकेशन केलं, मात्र आता डिटेल इन्वेस्टीगेशन करण्यासाठी एक टीम येत आहे ती टीम ठरवेल की त्यामध्ये कप सीरपचा काही प्रकार आहे की नाही.
प्राथमिक चौकशी नुसार पेशंटच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर त्यांच्याकडे कोल्ड्रिप नावाचे कप सिरप त्यांच्याकडे आढळून आलं आणि ते वापरल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज दिसून येतो. त्यामध्ये काही ड्रग्स आहेत ते कप सिरपमध्ये वापरले जात नाही. त्याचे जास्त प्रमाण असल्याचं सुद्धा पुढे येत आहे. महाराष्ट्रामध्ये जे मृत्यू झाले आहे कप सिरप लिंक आढळून आली नाही. मध्यप्रदेशच्या केसेस मध्ये कप सिरप लिंक असल्याचा संशय आम्हाला आहे त्यावर डिटेल इन्वेस्ट सुरू होत आहे त्यानंतर ते पुढे येईल. सध्या बारा पेशंट आहेत त्यापैकी काही सिरीयस आहेत त्यातील काही सरकारी आणि खाजगी रुग्णालयात आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.