
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यशाचं टप्पा गाठला आहे. 14 जुलैला प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान 3 नं चंद्राच्या परिघात यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. जवळपास 22 दिवसानंतर इस्रोच्या मोहिमेला यश मिळालं आहे. 40 दिवसांच्या चंद्रयान मिशनमधील हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात चंद्रावर उतरण्यासाठी पुढील 17 दिवस महत्त्वाचे असतील. 23 ऑगस्टला हा इस्रोच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असणार आहे.
स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. चंद्रयान 3 मोहिमेत लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहे. 16 ऑगस्टपर्यंत हे आता चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्टला लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं होईल. ते चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणारी रेंजची माहिती घेईल. तर लँडर पुढे जात 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. लँडरचं नाव विक्रम ठेवलं गेलं आहे. लँडर रोव्हरचं नाव मागच्या चंद्रयान 2 मोहिमेत घेतलं आहे. लँडरचं नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम ए साराभाई यांच्या नावावर आहे. ही मोहीम चंद्राच्या एका दिवसाच्या बरोबर काम करेल. पृथ्वीच्या तुलनेत बोलायचं झालं तर 14 दिवस असतील.
Chandrayaan-3 Mission:
The spacecraft has covered about two-thirds of the distance to the moon.Lunar Orbit Injection (LOI) set for Aug 5, 2023, around 19:00 Hrs. IST. pic.twitter.com/MhIOE65w3V
— ISRO (@isro) August 4, 2023
लँडर सुरक्षितरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं की नाही यांची शहनिशा करण्यासाठी सेंसर लावण्यात आले आहेत. रोव्हरसह याचं वजन जवळपास 1749 किलोग्राम इतक आहे. यात साईड माउंटेड सौर पॅनेल आहे. त्यातून 738 वॉट पॉवर जनरेट होऊ शकते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा या माध्यमातून अभ्यास केला जाईल. आता पुढच्या टप्प्यात विक्रम लँडरच्या लँडिंगवर लक्ष असणार आहे. कारण मागच्या वेळेस चंद्रयान 2 मोहिम अपयशी ठरली होती. तेव्हा लँडर व्यवस्थितरित्या चंद्रावर उतरलं नव्हतं आणि संपर्क तुटला होता.