AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pragyan rover on Moon | प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरला, पुढचे 14 दिवस चंद्रावर काय संशोधन करणार जाणून घ्या

Pragyan rover on Moon | काल टाळ्यांच्या कडकडात चांद्रयान-3 चांद्रभूमीवर उतरले. त्यानंतर काही तासांनी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला. आता प्रज्ञान रोव्हरकडून चंद्रावर संशोधन कार्य सुरु आहे.

Pragyan rover on Moon | प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरला, पुढचे 14 दिवस चंद्रावर काय संशोधन करणार जाणून घ्या
pragyan rover rolls out from vikram lander
| Updated on: Aug 24, 2023 | 9:03 AM
Share

बंगळुरु : आतापर्यंत अमेरिका, चीनला जे जमलं नाही ते आपण काल करुन दाखवलं. मागच्या आठवड्यात रशियाच्या लूना-25 यानाच चंद्रावर क्रॅश लँडिंग झालं होतं. भारताच चांद्रयान-3 बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. तमाम देशवासीय काल या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. घराघरातून टाळ्यांच्या कडकडात या क्षणाच सेलिब्रेशन करण्यात आलं. कारण चंद्रावर पोहोचण सोप नव्हतं. खूप अवघड टप्पे होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी सिद्ध करुन दाखवलं.

चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्रावर पोहोचला. प्रॉप्लशन मॉड्युल चंद्राभोवती भ्रमण करत आहे. आता विक्रम लँडर आणि त्यामध्ये असलेला रोव्हर चंद्रावर काय करणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचं उत्तर जाणून घेऊया.

विक्रम लँडरमधील चार पेलोड्स काय काम करणार?

रंभा – चंद्राच्या पुष्ठभागावर सूर्याच्या किरणांपासून येणाऱ्या प्लाज्मा कणाच घनत्वाचा अभ्यास करेल.

चास्टे – चंद्राच्या पुष्ठभागावरील तापमानाचा अभ्यास करणार.

इल्सा – लँडिंग साइटच्या आस-पास चंद्रावर भूकंप कशामुळे येतो, त्याचा अभ्यास करेल.

लेजर रेट्रोरिफ्लेक्टर एरे – चंद्राच डायनामिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार.

प्रज्ञान रोव्हरमधील दोन पेलोडस काय काम करणार?

लेजर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (Laser Induced Breakdown Spectroscope – LIBS). चंद्राच्या पुष्ठभागावरील रसायनांच प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. त्याशिवाय खनिजांचा शोध घेईल.

अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS) हा एलिमेंट कंपोजिशनचा अभ्यास करेल. मॅग्नेशियम, अल्यूमिनियम, सिलिकन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि टिन लँडिंग साइटच्या आसपास चंद्राच्या पुष्ठभागावर या घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न होईल. याचा फायदा काय?

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर मिळून चंद्रावरील वातावरण, पुष्ठभाग, रसायन, भूकंप आणि खनिज याचा अभ्यास करेल. इस्रोसह जगभरातील वैज्ञानिकांना यामुळे चंद्रावर अधिक अभ्यास करण्यासाठी माहिती मिळेल. रिसर्च अजून सोपा होईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?