पंतप्रधान मोदींच्या हस्ते खास नाण्यांचे प्रकाशन; अंध व्यक्तींनाही ओळखता येणार नाणी

| Updated on: Jun 06, 2022 | 2:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नाण्यांची एक खास मालिका जारी केली आहे. हे नाणं नेमकं किती रुपयांचं आहे? ते अंध व्यक्तींना देखील ओळखता येणार आहे. या नाण्यांच्या सिरीजमध्ये दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते खास नाण्यांचे प्रकाशन; अंध व्यक्तींनाही ओळखता येणार नाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) आज नाण्यांची एक खास मालिका जारी केली आहे. या मालिकेचे वैशिष्ट म्हणजे ही नाणी अंध व्यक्तींना देखील ओळखता येणार आहेत. या नाण्यांच्या मालिकेमध्ये (coins series) 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांचा (coins) समावेश आहे. या मालिकेत जारी करण्यात आलेलं नाण किती रुपयांचं आहे हे अंध व्यक्ती देखील सहज ओळखू शकतो. दिल्लीमध्ये अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत आयकॉनिक विक या साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मोदींनी केले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची ही खास मालिका जारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या या नाण्यांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा (AKAM)लोगो देखील असणार आहे.

नाण्यांचे वैशिष्ट काय?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत अर्थ मंत्रालयाच्या वतीने दिल्लीमध्ये आयकॉनिक विक या साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही खास नाण्यांची मालिका जारी केली. या मालिकेत जारी करण्यात आलेल्या नाण्यांचे खास वैशिष्ट म्हणजे ही नाणी अंध व्यक्तींना देखील ओळखू येणार आहेत. हे नाणं किती रुपयांचे आहे? हे तो सजह सागू शकणार आहे. अंधांना व्यवहार करण्याच्या दृष्टीने या नाण्यांची मोठी मदत होणार आहे. दरम्यान या नाण्यावर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ‘AKAM’चा लोगो देखील असणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्टार्टअपमध्ये मोठी वाढ

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद देखील साधाला. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने तरुणांना रोजगार मिळावा यासाठी काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली. गेल्या आठ वर्षांत मोठ्याप्रमाणात स्टार्टअपचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्याना रविवारी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय प्रयत्न करत आहे याची माहिती दिली होती. गेल्या आठ वर्षांत वनक्षेत्र वाढल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला होता.