नेहरुंमुळे चीनला संयुक्त राष्ट्राचे दरवाजे सताड उघडे; भारताने स्थायी सदस्यत्व गमावले, परराष्ट्र मंत्र्यांचा दावा काय

S. Jaishankar on Nehru : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाने मोठे वादंग उठले आहे. अर्थात भाजपच्या वतीने हा वाद काही पहिल्यांदा उकरून काढण्यात आलेला नाही. नेहरु यांच्या धोरणामुळेच चीनला संयुक्त राष्ट्राचे दार सताड उघडं झाल्याचा दावा पुन्हा करण्यात आला आहे.

नेहरुंमुळे चीनला संयुक्त राष्ट्राचे दरवाजे सताड उघडे; भारताने स्थायी सदस्यत्व गमावले, परराष्ट्र मंत्र्यांचा दावा काय
जयशंकर यांचा माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 9:26 AM

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला धार चढली आहे. त्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर आणि त्यांच्या धोरणावर निशाणा साधला. संयु्क्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषेदत भारताला कायमस्वरुपी सदस्य म्हणून चालून आलेली संधी नेहरुंमुळे भारताने गमाविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे चीनला ही संधी मिळाली. दहशतवादाविषयी काँग्रेस सरकारच्या भूमिकेवर पण त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात आयोजीत एका रॅलीत त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर चौफेर टीका केली.

देशाचे हित पहिल्यांदा जपले असते

एस जयशंकर यांनी नेहरु यांच्या धोरणावर कडाडून टीका केली. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य व्हावा, अशी नेहरुंची इच्छा नव्हती. पूर्व पंतप्रधानांनी भारताऐवजी चीनला प्राधान्य दिले. चीन हा स्थायी सदस्य व्हावा यासाठी भूमिका घेतल्याचा जोरदार हल्लाबोल केला. मी जर पंतप्रधान असतो तर सर्वात अगोदर देशाचे हित जपले असते. देशाचे हित सर्वात अगोदर पाहिले असते असा घणाघात त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

दहशतवादावर हल्लाबोल

भारत सीमेपलिकडील दहशतवाद बिलकूल सहन करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरक्षेची सर्व आव्हानं पेलल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वी 2008 मध्ये भारतावर दहशतवादी हल्ला झाला. मुंबई हादरली. आता सीमेपलिकडून कोणतेही दहशतवादी घटना घडत असेल तर त्याला भारत उरीसारखी प्रतिक्रिया देईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

10 वर्षांत सर्वच बदलले

एस जयशंकर यांनी काँग्रेस सरकार आणि भाजप नेतृत्वातील अंतर स्पष्ट करत मोदींवर स्तुतीसुमने उधळली. गेल्या दहा वर्षांत मोठा बदल झाल्याचा दावा त्यांनी केला. आज देश मजबूत हातात असल्याचे ते म्हणाले. योग्य निर्णयामुळे योग्य दिशेने देश जात असल्याचे ते म्हणाले. आज कोणताही निर्णय घेताना आम्ही पूर्णपणे निश्चिंत असतो, कारण आम्हाला आमच्या पाठिशी शक्ती असल्याचे माहित असल्याचा दावा त्यांनी केला.

नेहरुच दोषी

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे देशाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळाले नसल्याचा दावा जयशंकर यांनी केला. त्यासाठी त्यांनी नेहरूंना दोषी मानले. नेहरूंनी ही संधी भारतऐवजी चीनला दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Non Stop LIVE Update
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...
शिंदेंसह 'या' वारकरी दाम्प्त्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान
शिंदेंसह 'या' वारकरी दाम्प्त्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान.
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला...बघा महापूजेनंतर विठुरायाच गोजिर रुप
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला...बघा महापूजेनंतर विठुरायाच गोजिर रुप.
कुणाच्या मागे कोण?जरांगे मविआ पुरस्कृत? भुजबळांचा पुन्हा दंगलीचा डाव?
कुणाच्या मागे कोण?जरांगे मविआ पुरस्कृत? भुजबळांचा पुन्हा दंगलीचा डाव?.
विशाळगडाच्या अतिक्रमणावरून रंगतोय राजकीय वाद, नेमका कुणाचा हात?
विशाळगडाच्या अतिक्रमणावरून रंगतोय राजकीय वाद, नेमका कुणाचा हात?.
दादांच्या त्या दाव्यावर दरेकरांचा इशारा, खुमखुमी असेल तर दिल्लीशी बोला
दादांच्या त्या दाव्यावर दरेकरांचा इशारा, खुमखुमी असेल तर दिल्लीशी बोला.
दादांनी महायुतीतून बाहेर पडाव, आम्ही त्यांचं... आंबेडकरांकडून मोठी ऑफर
दादांनी महायुतीतून बाहेर पडाव, आम्ही त्यांचं... आंबेडकरांकडून मोठी ऑफर.
IAS अधिकारी पूजा खेडकरांचं सरकारकडून महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं
IAS अधिकारी पूजा खेडकरांचं सरकारकडून महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं.