जम्मू काश्मीर: डोडा जिल्ह्यात मिनीबस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!

| Updated on: Oct 28, 2021 | 1:17 PM

थाथरीहून ही बस डोडाकडे जात होती. त्याच दरम्यान सुई ग्वारीजवळ चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस बाजूच्याच चिनाब नदीत जाऊन कोसळली.

जम्मू काश्मीर: डोडा जिल्ह्यात मिनीबस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!
मिनीबस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू
Follow us on

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज भीषण अपघात झाला आहे. इथं थाथरीहून डोडाला जाणारी मिनीबस दरीत कोसळली आहे, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हेच नाही तर अनेकजण जखमी झाले आहे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Jammu and Kashmir: Minibus crashes in Doda district, 8 killed, rescue operation begins!)

थाथरीहून ही बस डोडाकडे जात होती. त्याच दरम्यान सुई ग्वारीजवळ चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस बाजूच्याच चिनाब नदीत जाऊन कोसळली. डोडाच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार बचावकार्य अद्यापही सुरु आहे. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

8 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेनंतर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील डोडा जवळच्या थात्रीजवळ झालेल्या रस्ते अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आत्ताच डीसी डोडा विकास शर्मा यांच्याशी बोललो, जखमींना जीएमसी डोडा येथे हलवलं जात आहे. पुढे जी काही मदत लागेल ती दिली जाईल, असंही ते म्हणाले.

पंतप्रधानांकडून मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना मदतही जाहीर केली आहे. ज्यांनी या दुर्घटनेत जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रूपये दिले जाणार आहेत. तर जखमींना 50,000 रुपये दिले जाणार आहे. मोदींनी आपल्या भावना कुटुंबासोबत असल्याचं म्हटलं आहे. अद्यापही बचावकार्य सुरु असून, जखमीचा निश्चित आकडा अद्याप हाती आलेला नाही.

हेही वाचा:

Jammu & Kashmir Raids: NIA चे काश्मीरमध्ये 11 ठिकाणी छापे, जमात-ए-इस्लामी विरोधात कारवाई

भारताचे मोठे यश; 5000 किमीचा पल्ला असलेल्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी